Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 84

97 Mantra
33/84
Devata- सविता देवता Rishi- भरद्वाज ऋषिः Chhand- निचृज्जगती Swara- निषादः
Mantra with Swara
अद॑ब्धेभिः सवितः पा॒युभि॒ष्ट्वꣳ शि॒वेभि॑र॒द्य परि॑ पाहि नो॒ गय॑म्।हिर॑ण्यजिह्वः सुवि॒ताय॒ नव्य॑से॒ रक्षा॒ माकि॑र्नोऽअ॒घश॑ꣳसऽईशत॥८४॥

अद॑ब्धेभिः। स॒वि॒त॒रिति॑ सवितः। पा॒युभि॒रिति॑ पा॒युऽभिः॑। त्वम्। शि॒वेभिः॑। अ॒द्य। परि॑। पा॒हि। नः॒। गय॑म् ॥ हिर॑ण्यजिह्व॒ इति॒ हिर॑ण्यजिह्वः। सु॒वि॒ताय॑। नव्य॑से। र॒क्ष॒। माकिः॑। नः॒। अ॒घशं॑सः। ई॒श॒त॒ ॥८४ ॥

Mantra without Swara
अदब्धेभिः सवितः पायुभिष्ट्वँ शिवेभिरद्य परि पाहि नो गयम् । हिरण्यजिह्वः सुविताय नव्यसे रक्षा माकिर्ना अघशँस ईशत ॥

अदब्धेभिः। सवितरिति सवितः। पायुभिरिति पायुऽभिः। त्वम्। शिवेभिः। अद्य। परि। पाहि। नः। गयम्॥ हिरण्यजिह्व इति हिरण्यजिह्वः। सुविताय। नव्यसे। रक्ष। माकिः। नः। अघशंसः। ईशत॥८४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (सतवितः) समग्र ऐश्‍वर्यवान राजा, (त्वम्) आपण (अद्य) आज (अदब्धेभिः) न भंगणार्‍या वा अयशस्वी न होणार्‍या आणि (शिवेभिः) मंगलकारी (पायुभिः) अनेकप्रकारे रक्षण करणार्‍या उपायांनी वा साधनांनी (नः) आम्हा (गयम्) प्रजाजनांची (परि, पाहि) सर्वदिशांनी रक्षा करा. आपण (हिरण्यजिह्वः) सर्वांचे हित करणारी उचित वाणी बोलता. यामुळे कृपया (नव्यसे) अत्यंत नवीन (सुविताय) ऐश्‍वर्यप्राप्तीसाठी (नः) आमची (रक्ष) रक्षा करा (आम्ही नवीन व्यवसायाद्वारे धन अर्जित करतो. आम्हांस आपले संरक्षण असू द्या. ) त्यामुळे (अघशंसः) दुष्ट चोर लुटारु आमच्यावर आक्रमण करण्यात (माकिः ईशत) यशस्वी होणार नाहीत. ॥84॥
Essence
भावार्थ - राजाची ही पात्रता वैशिष्ट्य मानले जाईल की जेव्हा ते राजा प्रजेला संतानवत मानतील, प्रजेला ब्रह्मचर्य, आणि विद्या धारण करण्यात तसेच स्वयंवर पद्धतीने विवाह करण्याची व्यवस्था करतील आणि चोर-दरोडेखोरांपासून प्रजेचे रक्षण करीत सर्वदृष्ट्या राज्याचा उत्कर्ष साधतील. ॥84॥
Subject
पुनश्‍च, त्या विषयी -