Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 82

97 Mantra
33/82
Devata- विश्वेदेवा देवताः Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- निचृद्बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
यस्या॒यं विश्व॒ऽआर्यो॒ दासः॑ शेवधि॒पाऽअ॒रिः।ति॒रश्चि॑द॒र्य्ये रु॒शमे॒ पवी॑रवि॒ तुभ्येत्सोऽअ॑ज्यते र॒यिः॥८२॥ति॒रश्चि॑द॒र्य्ये रु॒शमे॒ पवी॑रवि॒ तुभ्येत्सोऽअ॑ज्यते र॒यिः॥८२॥

यस्यः॑ अ॒यम्। विश्वः॑। आर्य्यः॑। दासः॑। शे॒व॒धि॒पा इति॑ शेवधि॒ऽपाः। अ॒रिः ॥ ति॒रः। चि॒त्। अ॒र्य्ये। रु॒शमे॑। पवी॑रवि। तुभ्य॑। इत्। सः। अ॒ज्य॒ते॒। र॒यिः ॥८२ ॥

Mantra without Swara
यस्यायँविश्वऽआर्या दासः शेवधिपाऽअरिः । तिरश्चिदर्ये रुशमे परीरवि तुभ्येत्सोऽअज्यते रयिः ॥

यस्यः अयम्। विश्वः। आर्य्यः। दासः। शेवधिपा इति शेवधिऽपाः। अरिः॥ तिरः। चित्। अर्य्ये। रुशमे। पवीरवि। तुभ्य। इत्। सः। अज्यते। रयिः॥८२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे राजन्, (यस्य) आपला जो (अयम्) हा (विश्‍वः) संपूर्णतः (आर्य्यः) धार्मिक गुण, कर्म, स्वभावाचा मनुष्य आहे, तो (दासः) सेवकाप्रमाणे आज्ञाकारी असून (शेवधिपाः) ठेव वा कोणाची रक्षा करणारा आहे. तसेच हा (अरिः) शत्रूची (पवीरवि) धन-संपत्ती आणि शस्त्र आदी हिसकावून घेण्यासाठी उपयुक्त आहे. हा (रुशमे) प्रसंग पडल्यास हिंसा व ताडन आदीचा उपयोग करणारा तसेच (अर्य्ये) धनाधीश वैश्यासाठी (तिरः) त्याचे धन (तिरः) लपवून ठेवणारा (शत्रूचे भय दाखवून वैश्याकडून धन हिरावून नेऊ नये म्हणून तो धन गुप्त ठेवणारा) आहे. (चित्) आणखीन तो (इत्) निश्‍चयाने (तुभ्यम्) आपल्यासाठीच व आपलाच आहे आणि (सः) ते आपणही (रयिः) त्याला धनाप्रमाणे (अज्यते) प्राप्त होता (आपणदेखील त्याचे सहाय्यक व आश्रयदाते आहात. तेव्हां दोघांनी शत्रूवर विजय मिळवावा) ॥82॥
Essence
भावार्थ - ज्या राजाला सर्व आर्यजन राज्यरक्षण आणि आज्ञापालनकार्यात सहयोग देतात, जो राजा कर न देणार्‍या शत्रूकडूनही (कर वा चौथाई) वसूल करण्यात सक्षम आहे, असे हे राजा आप उत्तम शोभावान वा कीर्तीमंत आहात. ॥82॥
Subject
आता राजधर्मा विषयी -