Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 8

97 Mantra
33/8
Devata- विद्वांसो देवता Rishi- विश्वामित्र ऋषिः Chhand- भुरिक् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
मू॒र्द्धानं॑ दि॒वोऽअ॑र॒तिं पृ॑थि॒व्या वैश्वान॒रमृ॒तऽआ जा॒तम॒ग्निम्।क॒विꣳ स॒म्राज॒मति॑थिं॒॑ जना॑नामा॒सन्ना पात्रं॑ जनयन्त दे॒वाः॥८॥

मू॒र्द्धान॑म्। दि॒वः। अ॒र॒तिम्। पृ॒थि॒व्याः। वै॒श्वा॒न॒रम्। ऋ॒ते। आ। जा॒तम्। अ॒ग्निम् ॥ क॒विम्। स॒म्राज॒मिति॑ स॒म्ऽराज॑म्। अति॑थिम्। जना॑नाम्। आ॒सन्। आ। पात्र॑म्। ज॒न॒य॒न्त॒। दे॒वाः ॥८ ॥

Mantra without Swara
मूर्धानन्दिवो अरतिम्पृथिव्या वैश्वानरमृतऽआ जातमग्निम् । कविँ सम्राजमतिथिञ्जनानामासन्ना पात्रञ्जनयन्त देवाः ॥

मूर्द्धानम्। दिवः। अरतिम्। पृथिव्याः। वैश्वानरम्। ऋते। आ। जातम्। अग्निम्॥ कविम्। सम्राजमिति सम्ऽराजम्। अतिथिम्। जनानाम्। आसन्। आ। पात्रम्। जनयन्त। देवाः॥८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ -हे मनुष्यांनो, (देवाः) विद्वानजन (दिवः) आकाशाच्या (मूद्धनिम्) वरच्या भागात सूर्यरूपाने विद्यमान (अग्नीला प्रकट करतात, त्यापासून उपयोग घेतात) तसेच (पृथिव्याः) पृथ्वीला (अरतिम्) प्राप्त झालेल्या या (वैश्‍वानरम्) सर्व हितकारी भौतिकअग्नीला (ऋते) यज्ञाग्नीला (आ, जातम्) प्रत्यक्षात प्रकट करतात. (त्या अग्नीत यज्ञ करतात) अशा (कविम्) सर्व काही दाखविणार्‍या (सम्राजम्) सम्यकरीत्या प्रकाशमान आणि (जनानाम्) सांसारिक लोकांच्या (अतिथिम्) अतिथिप्रमाणे भोजनाचा प्रथम आस्वाद घेणार्‍या (जेवणापूर्वी अग्नीला चित्राहुती दाखवतात, त्यारूपातील (पात्रम्) रक्षणीय (घरात सांभाळून ठेवण्यास योग्य अशा (अग्निम्) अग्नीला तुम्ही प्रकट उपयोगात आणा कारण तो (आसन्) ईश्‍वराच्या मुकरूप सामर्थ्याने उत्पन्न आहे. त्या अग्नीचा ज्याप्रमाणे देवविद्वान लोक प्रकट उपयोग घेतात, तद्वत, हे मनुष्यांनो, तुम्हीही उपयोग घ्या ॥8॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जे लोक पृथ्वी, जल, वायू आणि आकाशात व्याप्त विद्युतरूप अग्नीला प्रकट करतात (त्या अदृश्य शक्तीला. विद्युतनिर्माण यंत्राद्वारे प्रत्यक्ष करतात) आणि तिचा यंत्र, कलायंत्र आदीद्वारे युक्तीने वापर करतात, ते कोणते कार्य पूर्ण करू शकणार नाहीत? अर्थात त्यांची सर्व कार्य पूर्ण होतात. ॥8॥
Subject
पुन्हा त्या विषयी -