Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 73

97 Mantra
33/73
Devata- अध्वर्यू देवते Rishi- दक्ष ऋषिः Chhand- निचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
दैव्या॑वध्वर्यू॒ आ ग॑त॒ꣳ रथे॑न॒ सूर्य॑त्वचा।मध्वा॑ य॒ज्ञꣳ सम॑ञ्जाथे। तं प्र॒त्नथा॑। अ॒यं वे॒नः॥७३॥

दैव्यौ॑। अ॒ध्व॒र्यू॒ऽइत्य॑ध्वर्यू। आ। ग॒त॒म्। रथे॑न। सूर्य॑त्व॒चेति॒ सूर्य॑ऽत्वचा ॥ मध्वा॑। य॒ज्ञम्। सम्। अ॒ञ्जा॒थ॒ऽ इत्य॑ञ्जाथे ॥७३ ॥

Mantra without Swara
दैव्यावध्वर्यूऽआ गतँ रथेन सूर्यत्वचा । मध्वा यज्ञँ समञ्जाथे । तम्प्रत्नथायँवेनः॥

दैव्यौ। अध्वर्यूऽइत्यध्वर्यू। आ। गतम्। रथेन। सूर्यत्वचेति सूर्यऽत्वचा॥ मध्वा। यज्ञम्। सम्। अञ्जाथऽ इत्यञ्जाथे॥७३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (दैव्यौ) विद्वानांत सर्वाधिक प्रवीण (तसेच तंत्रज्ञान व यांत्रिकी ज्ञानात कुशल असे हे वैज्ञानिकहो, तुम्ही (अर्ध्वयू) आत्म्यात वा अंतःकरणात अहिंसावृत्ती असलेले आहात (म्हणजे तुम्ही तुमच्या विमान, अस्त्र-शस्त्रादीचा प्रयोग विनाश वा हिंसेकरिता करणारे नाहीत) तुम्ही दोघे (सूर्यत्वाचा) सूर्याच्या प्रकाशप्रमाणे दीप्ती वा चमक असलेल्या (रथेन) आनंददायक यानाद्वारे (आ, गतम्) इथे येत जा आणि येऊन (मध्वा) मधुर वाणीद्वारे (यज्ञम्) या यानाचे (संचालन उड्डाण आदी तंत्रा विषयी (सम्, अञ्जाथे) तपशीलाने आम्हांला सांगत जा. ॥73॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी पृथ्वी, जल आणि आकाश यांच्यामुळे व यांच्यात चालणार्‍या अशा शोभायमान सूर्या सारख्या उत्तम यानांची निर्मिती करावी आणि त्याद्वारे इच्छित कार्यांची पूर्तता करावी. ॥73॥
Subject
पुढील मंत्रात यान निर्माणा विषयी -
Footnote
(तळटीप - या मंत्राच्या शेवटी ‘ तम्प्रत्नथा अयंवेनः’ ही प्रतीकें पूर्वी अ. 7/मंत्र 12/16 मधे आली आहेत. येथे कर्मकांडाच्या पूर्तर्तसाठी त्यांची पुनरुक्ती आहे. अर्थ तिथे पहावा)