Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 72

97 Mantra
33/72
Devata- विद्वान् देवता Rishi- दक्ष ऋषिः Chhand- निचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
काव्य॑योरा॒जाने॑षु॒ क्रत्वा॒ दक्ष॑स्य दुरो॒णे।रि॒शाद॑सा स॒धस्थ॒ऽआ॥७२॥

काव्य॑योः। आ॒जाने॒ष्वित्या॒ऽजाने॑षु। क्रत्वा॑। दक्ष॑स्य। दु॒रो॒णे। रि॒शाद॑सा। स॒धस्थ॒ इति॑ स॒धऽस्थे॑। आ ॥७२ ॥

Mantra without Swara
काव्ययोराजानेषु क्रत्वा दक्षस्य दुरोणे । रिशादसा सधस्थऽआ ॥

काव्ययोः। आजानेष्वित्याऽजानेषु। क्रत्वा। दक्षस्य। दुरोणे। रिशादसा। सधस्थ इति सधऽस्थे। आ॥७२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (रिशादिशा) अविद्या आदी दोषांचे नाशक अध्यापक आणि हे उपदेशक, (काव्ययोः) कवि विद्वानांनी निर्मित आचरण-नियम सांगणारे, परमार्थाचे साधक जे ग्रंथ आहेत (आजानेषु) त्या ग्रंथांच्या पठन-पाठन आदी कार्यांसाठी (क्रत्वा) विचार आणि कर्म करण्यासाठी (जिज्ञासू लोक) (दक्षस्य) ज्या कुशल व्यक्तीच्या (सधस्थे) सभास्थानात बसतात, हे अध्यापक आणि उपदेशक, आपण त्या (दुरोणे) घरात वा सभेत (आ) येत जा, (उपस्थित राहून चर्चा उपदेश, ज्ञानदान करीत जा) ॥72॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यहो, जे अध्यापक आणि उपदेशक गण राजाला तसे प्रजाजनांना बुद्धिमान आणि नीरोगी करतात, लोकांमधे प्रीतीभाव, धार्मिकता आणि पुरुषार्थवृत्ती निर्माण करतात, ते पित्याप्रमाणे सत्कारणीय वा आदरणीय असतात, हे लक्षात असू द्या. ॥72॥
Subject
अध्यापक आणि उपदेशक कसे असावेत, याविषयी -