Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 71

97 Mantra
33/71
Devata- मित्रावरुणौ देवते Rishi- वसिष्ठ ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
गाव॒ऽउपा॑वताव॒तं म॒ही य॒ज्ञस्य॑ र॒प्सुदा॑।उ॒भा कर्णा॑ हिर॒ण्यया॑॥७१॥

गावः। उप॑। अ॒वत॒। अ॒वतम्। म॒हीऽइति॑ म॒ही। य॒ज्ञस्य॑। र॒प्सुदा॑ ॥ उभा। कर्णा॑। हि॒र॒ण्यया॑ ॥७१ ॥

Mantra without Swara
गावऽउपावतावतम्मही यज्ञस्य रप्सुदा । उभा कर्णा हिरण्यया ॥

गावः। उप। अवत। अवतम्। महीऽइति मही। यज्ञस्य। रप्सुदा॥ उभा। कर्णा। हिरण्यया॥७१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, ज्याप्रमाणे (रप्सुदा) (पदार्थ व प्राण्यांना) सुंदर आकार प्रदान करणारे (उभा) सूर्य आणि पृथ्वी) हे दोघे (कर्णा) कार्यसाधक आणि (हिरण्यया) ज्योतिस्वरूप आहेत, (मही) विशाल परिमाण वा आकारवान आहेत आणि ते दोघे (यज्ञस्य) या संगती पूर्ण जगाची रक्षा करतात. कशाप्रकारे की जसे कूप, (विहीर वा सरोवर) लोकांचे रक्षण करतात, हे मनुष्यानो, त्याप्रमाणे सूर्य आणि पृथ्वी तसे (गावः) सूर्याची किरणें देखील तुमचे (उष, अवत) रक्षण करोत ॥71॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जसे कृषकगण विहिरीच्या पाण्याने शेताची आणि मळ्याची रक्षा करून धनसंपन्न होतात, तसे सूर्य आणि पृथ्वी सर्वांना धनसंपदा देतात. (मनुष्याने त्यापासून तसे लाभ घ्यावे) ॥71॥
Subject
पृथ्वी व सूर्य कसे आहेत, याविषयी -