Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 69

97 Mantra
33/69
Devata- सविता देवता Rishi- भरद्वाज ऋषिः Chhand- निचृज्जगती Swara- निषादः
Mantra with Swara
अद॑ब्धेभिः सवितः पा॒युभि॒ष्ट्वꣳ शि॒वेभि॑र॒द्य परि॑ पाहि नो॒ गय॑म्।हिर॑ण्यजिह्वः सुवि॒ताय॒ नव्य॑से॒ रक्षा॒ माकि॑र्नोऽअ॒घश॑ꣳसऽ ईशत॥६९॥

अद॑ब्धेभिः। स॒वित॒रिति॑ सवितः। पा॒युभि॒रिति॑ पा॒युभिः॑। त्वम्। शि॒वेभिः॑। अ॒द्य। परि॑। पा॒हि॒। नः॒। गयम् ॥ हिर॑ण्यजिह्व इति॒ हिर॑ण्यऽजिह्वः। सु॒विताय॑। नव्य॑से। र॒क्ष॒। माकिः॑ नः॒। अ॒घशं॑सः। ई॒श॒त॒ ॥६९ ॥

Mantra without Swara
अदब्धेभिः सवितः पायुभिष्ट्वँ शिवेभिरद्य परि पाहि नो गयम् । हिरण्यजिह्वः सुविताय नव्यसे रक्षा माकिर्ना अघशँस ईशत ॥

अदब्धेभिः। सवितरिति सवितः। पायुभिरिति पायुभिः। त्वम्। शिवेभिः। अद्य। परि। पाहि। नः। गयम्॥ हिरण्यजिह्व इति हिरण्यऽजिह्वः। सुविताय। नव्यसे। रक्ष। माकिः नः। अघशंसः। ईशत॥६९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्त - हे (सवितः) अनेक पदार्थांचे उत्पादक तेजस्वी विद्वान/राजन्, (त्वम्) आपण (अदब्धेभिः) ज्याला कोणीही दमन पराजित करू शकत नाही, अशा (शिवेभिः) कल्याणकारी (पायुभिः) रक्षणांत्मक उपायांनी वा साधनांनी (नः) आम्हा प्रजाजनांच्या (गयम्) प्रशंसनीय संतती, धन आणि घर यांची (परि, पाहि) सर्वतः रक्षा करा. (हिरण्यजिह्वः) सर्वांच्या हिताकरिता ज्यांची वाणी सदा चांगले बोलते, असे आपण (नवकयसे) अत्यंत अधिक वा नवीन (सुविताय) ऐश्‍वर्यप्राप्तीसाठी (नः) आमची (रक्ष) रक्षा करा तयमुळे (अघशंसः) पापी वा पापाची प्रशंसा करणारे दुर्जन व चोर आदी लोक आमच्यावर (माकिः) अत्याचार करण्यात (ईशत) यशस्वी होऊ नयेत. ॥69॥
Essence
भावार्थ - प्रजाजनांनी राजपुरूषांशी असे सांगावे की तुम्ही आमची संताने, धन आणि घरें आणि अन्य पदार्थांची सुरक्षा करा. तसेच ऐश्‍वर्यवृद्धीच्या नवनवीन संधी देत पीडा देणार्‍या दुष्टांपासून आम्हाला दूर ठेवा ॥69॥
Subject
पुनश्‍च, तोच विषय -