Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 61

97 Mantra
33/61
Devata- इन्द्राग्नी देवते Rishi- भरद्वाज ऋषिः Chhand- निचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
उ॒ग्रा वि॑घ॒निना॒ मृध॑ऽइन्द्रा॒ग्नी ह॑वामहे। ता नो॑ मृडातऽई॒दृशे॑॥६१॥

उ॒ग्रा। विघ॒निनेति॑ विऽघ॒निना॑। मृधः॑। इ॒न्द्रा॒ग्नीऽइती॑न्द्रा॒ग्नी। ह॒वा॒म॒हे॒ ॥ ता। नः॒। मृ॒डा॒तः॒। ई॒दृशे॑ ॥६१ ॥

Mantra without Swara
उग्रा विघनिना मृधऽइन्द्राग्नी हवामहे । ता नो मृडात ईदृशे ॥

उग्रा। विघनिनेति विऽघनिना। मृधः। इन्द्राग्नीऽइतीन्द्राग्नी। हवामहे॥ ता। नः। मृडातः। ईदृशे॥६१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, आम्ही (राज्याचे नागरिक) (उग्रा) अत्यधिक बली व तेजस्वी स्वभाव असलेल्या अती (मृधः) हिंसक शत्रू व प्राणी आदींना (विघनिना) ठार मारणार्‍या (इन्द्राग्नी) सभापती-सेनापतीला (संकटसमयी) (हवामहे) बोलावतो. (ता) तेव्हा ता (ईदृशे) या प्रकारच्या संग्राम आदी प्रसंगी (नः) आम्हा नागरिकांचे रक्षण करून (मृडातः) सुखी करतात (तुम्हीही वेळ पडल्यास त्यांना आवाहन करा) ॥61॥
Essence
भावार्थ - राजसभा आणि सेनेचे प्रमुख जेव्हां पक्षपात न करता आपली शक्ती वाढवून शत्रूला जिंकतात, तेंव्हा ते सर्वांसाठी सुखकारक ठरतात. ॥61॥
Subject
सभापती सेनापतीने काय करावे, याविषयी -