Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 59

97 Mantra
33/59
Devata- इन्द्रो देवता Rishi- कुशिक ऋषिः Chhand- भुरिक् पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
वि॒दद्यदी॑ स॒रमा॑ रु॒ग्णमद्रे॒र्महि॒ पाथः॑ पू॒र्व्यꣳ स॒ध्र्यक्कः।अग्रं॑ नयत्सु॒पद्यक्ष॑राणा॒मच्छा॒ रवं॑ प्रथ॒मा जा॑न॒ती गा॑त्॥५९॥

वि॒दत्। यदि॑। स॒रमा॑। रु॒ग्णम्। अद्रेः॑। महि॑। पाथः॑। पूर्व्यम्। स॒ध्र्य॒क्। क॒रिति॑ कः ॥ अग्र॑म्। न॒य॒त्। सु॒पदीति॑ सु॒ऽपदी॑। अक्ष॑राणाम्। अच्छ॑। रव॑म्। प्र॒थ॒मा। जा॒न॒ती। गा॒त् ॥५९ ॥

Mantra without Swara
विदद्यदी सरमा रुग्णमद्रेर्महि पाथः पूर्व्यँ सर्ध्यक्कः । अग्रन्नयत्सुपद्यक्षराणामच्छा रवम्प्रथमा जानती गात् ॥

विदत्। यदि। सरमा। रुग्णम्। अद्रेः। महि। पाथः। पूर्व्यम्। सध्र्यक्। करिति कः॥ अग्रम्। नयत्। सुपदीति सुऽपदी। अक्षराणाम्। अच्छ। रवम्। प्रथमा। जानती। गात्॥५९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (यदि) जर वा जी स्त्री (सरमा) पतीला अनुकूल वागत असेल, (प्रथमा) सर्वप्रथम प्रख्यात (सुपदी) सुंदर चरण असलेली तसेच (अक्षराणाम्) आकार आदी वर्णयांचा (रवम्) स्पष्ट उच्चारण (जानती) कौशल्य जाणणारी असेल. या शिवाय (रुग्नम्) रोगी प्राण्याची (विदत्) सेवा करणे जाणत असेल (तर ती अवश्य सुखी वा आनंदी असते) तसेच (अगम्) पतीला (वा पुरूषांना) पुढे (प्रगतीकडे) (नयत्) नेणारे (सध्रयक्) सर्वांपर्यंत पोहचणारे तसेच (पूर्व्यम्) (म्हणजे स्वादिष्ट अन्नाची स्वाद घेतलेल्या) पूर्वीच्या लोकांनी सेवन केलेले (पाथः) अन्न (कः) तयार करणारी (उत्तम स्वयंपाक करणारी स्त्री) असेल की जे अन्नधान्य (महि) महान् गुणयुक्त (अद्रेः) भेगाने भूमीला दिले आहे, त्या धान्यापासून सैपाक तयार करून पतीला (अच्छ) चांगल्याप्रमारे जेवण (जात्) देत वा वाढत असेल तर ती स्त्री श्रेष्ठ सुख प्राप्त करते (सदा आनंदी राहते) ॥59॥
Essence
भावार्थ - जसे एक कुशल वैद्य औषधीविषयी सर्व जाणतात, तद्वत जी स्त्री सर्वांसाठी हितकर अन्न तयार करणे जाणत असेल आणि जेवणाच्या वेळी, वौताना आदी वेळी यथोचित प्रिय भाषण करीत असेल, ती सदा श्रेष्ठ सुखाची अधिकारीणी होते. ॥59॥
Subject
स्त्रियांनी काय केले पाहिजे, याविषयी -