Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 51

97 Mantra
33/51
Devata- विश्वेदेवा देवताः Rishi- कूर्म ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अ॒र्वाञ्चो॑ऽअ॒द्या भ॑वता यजत्रा॒ऽआ वो॒ हार्दि॒ भय॑मानो व्ययेयम्। त्राध्वं॑ नो देवा नि॒जुरो॒ वृक॑स्य॒ त्राध्वं॑ क॒र्त्ताद॑व॒पदो॑ यजत्राः५१॥

अ॒र्वाञ्चः॑। अ॒द्य। भ॒व॒त॒। य॒ज॒त्राः॒। आ। वः॒। हार्दि। भय॑मानः। व्य॒ये॒य॒म् ॥ त्राध्व॑म्। नः॒। दे॒वाः॒। नि॒जुर॒ऽइति॑ नि॒जुरः॑। वृक॑स्य। त्राध्व॑म्। क॒र्त्तात्। अ॒व॒पद॒ इत्य॑व॒ऽपदः॑। य॒ज॒त्राः॒ ॥५१ ॥

Mantra without Swara
अर्वाञ्चोऽअद्या भवता यजत्रा आ वो हार्दि भयमानो व्ययेयम् । त्राध्वन्नो देवा निजुरो वृकस्य त्राध्वङ्कर्तादवपदो यजत्राः ॥

अर्वाञ्चः। अद्य। भवत। यजत्राः। आ। वः। हार्दि। भयमानः। व्ययेयम्॥ त्राध्वम्। नः। देवाः। निजुरऽइति निजुरः। वृकस्य। त्राध्वम्। कर्त्तात्। अवपद इत्यवऽपदः। यजत्राः॥५१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (यजत्राः) संगती, (सहयोग आणि ऐक्यभाव यांची वृद्धी) करणार्‍या (देवाः) विद्वज्जनहो, आपण (अद्य) आज (अर्वाञ्चः) आमच्यासमोर (भयत) या (उपस्थित व्हा) अर्थात आमच्याशी विरूद्ध वागूं नका, (अनुकूल व्हा) (भयमानः) (दुःख आणि संकटाला भिणारा मी (वः) तुमच्या (हार्दि) हृदयात (आ, व्ययेयम्) शिरावे (म्हणजे माझ्याविषयी तुमच्या मनात करूणा उत्पन्न व्हावी) (नः) आपण आम्हाला (सामान्यजनांना) (वृकस्य) चोर अथवा वाघ आदी (निजुरः) हिंसक प्राण्यांपासून (त्राध्वम्) वाचवा. हे (यजत्राः) विद्वांनांचा सत्कार करणार्‍या (राजपुरूष) लोकहो, तुम्ही (अवपदः) विहीर, खोल खड्डा आदी स्थानात पडण्यापासून (त्राध्वम्) आम्हास वाचवा (सुगम वा सुखकर मार्ग अथवा आचारवान् जीवन व्यतीत करण्याची रीती शिकवा) ॥51॥
Essence
भावार्थ - प्रजाजनांनी राजपुरुषांना अशी प्रार्थना करावी की - हे पूज्य राजपुरूष, (पोलिस-अधिकारी वा पोलिस-शिपाई) तसेच हे विद्वज्जन, आपण सदा आम्हाशी अनुकूल रहा, कपट-धोका आदीने वागू नका आणि आम्हाला भयापासून वाचवा तसेच चोर, वाघ आदी प्राण्यापासून व रस्त्यातील खड्डे-खळग्यांहून आम्हास वाचवा (रस्ते चांगले तयार करा व येणार्‍या चोर-दरोडेखोरांपासून मार्ग मुक्त ठेवा) ॥51॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय -