Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 5

97 Mantra
33/5
Devata- अग्निर्देवता Rishi- कुत्स ऋषिः Chhand- स्वराट् पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
द्वे विरू॑पे चरतः॒ स्वर्थे॑ऽअ॒न्यान्या॑ व॒त्समुप॑ धापयेते।हरि॑र॒न्यस्यां॒ भव॑ति स्व॒धावा॑ञ्छु॒क्रोऽअ॒न्यस्यां॑ दद्य्शे सु॒वर्चाः॑॥५॥

द्वेऽइति॑ द्वे। विरू॑पे॒ इति॒ विऽरू॑पे। च॒र॒तः॒। स्वर्थे॒ इति॑ सु॒ऽअर्थे॑। अ॒न्यान्येत्यन्याऽअ॑न्या। व॒त्सम्। उप॑। धा॒प॒ये॒ते॒ऽइति॑ धापयेते ॥ हरिः॑। अ॒न्यस्या॑म्। भव॑ति। स्व॒धावा॒निति॑ स्व॒धाऽवा॑न्। शु॒क्रः। अ॒न्यस्या॑म्। द॒दृ॒शे॒। सु॒वर्चा॒ इति॑ सु॒ऽवर्चाः॑ ॥५ ॥

Mantra without Swara
द्वे विरूपे चरतः स्वर्थेऽअन्यान्या वत्समुप धापयेते । हरिरन्यस्याम्भवति स्वधावाञ्छुक्रोऽअन्यस्यान्ददृशे सुवर्चाः ॥

द्वेऽइति द्वे। विरूपे इति विऽरूपे। चरतः। स्वर्थे इति सुऽअर्थे। अन्यान्येत्यन्याऽअन्या। वत्सम्। उप। धापयेतेऽइति धापयेते॥ हरिः। अन्यस्याम्। भवति। स्वधावानिति स्वधाऽवान्। शुक्रः। अन्यस्याम्। ददृशे। सुवर्चा इति सुऽवर्चाः॥५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (स्वर्थे) सुंदर प्रयोजन (समोर ठेऊन कार्य करणार्‍या) (द्वे) दोन (विरूपे) भिन्न दोन रूपवती स्त्रिया (चरतः) भोजन आदी गृहकार्य करतात. यापैकी (अन्यान्या) प्रत्येक वेगवेगळ्या वेळी स्वतंत्रपणे (वत्सम्) बोबडे बोल बोलण्याच्या. त्या दोनपैकी (अन्यस्याम्) एकीच्या पोटीं (स्वधावान्) शान्ति आदी गुणांनी युक्त (हरिः) मनोहारी असा मुलगा जन्म घेतो. आणि (शुक्रः) शीघ्रकारी (सुवर्चाः) सुंदर तेजस्वी एक पुत्र (अन्यस्याम्) दुसरीच्या पोटी जन्मलेला (ददृशे) दिसून येतो. (ही एक दिसून येतो. (ही एक प्रहेलिका वा गूढ काव्य आहे आणि त्याचे उत्तर पुढे दिले आहे.) याच प्रकारे उदात प्रयोजन समोर ठेऊन काळी रात्र आणि श्‍वेत दिवस हे दोन भिन्न-भिन्न रूपवान रात्र-दिवस विद्यमान आहेत. दोघे भिन्न दोन वेळी संसाररूप बालकाला दूध पाजवितात. या दोनपैकी रात्र अमृतरूप गुणवान मनोहर चंद्ररूप बालकाला जन्म देते आणि दिनरूप स्त्रीला पवित्र कर्ता सुंदर तेजस्वी सूर्यरूप पुत्र उत्पन्न होतो. मनुष्यांनो, तुम्ही वरील आलंकारिक रूप प्रश्‍नांचे उत्तर समजून घ्या. ॥5॥
Essence
भावार्थ - या मंत्रात अनुभयारूपकालंकार आहे. ज्याप्रमाणे दोन स्त्रिया अथवा दोन गायी संतानाची इच्छा करीत पृथक् पृथक राहून भिन्न-भिन्न वेळी एका बालकाची रक्षा करतात. त्यापैकी एकीला हृदयाला अति प्रिय असा महागुणी शांतिशील मुलगा व्हावा आणि दुसरीला शीघ्रकार्यकारी तेजस्वी शत्रूना दुःखदायी बालक जन्मावा, त्याप्रमाणे भिन्न दोन रूपवान दोन म्हणजे रात्र-दिवस भिन्न भिन्न वेळी संसाररूप बालकाचे पालन करतात- ते कशाप्रकारे? रात्र रूप स्त्री अमृत वर्षा करणार्‍या चित्तहर चंद्ररूप बालक उत्पन्न करते आणि दिवसरूप स्त्री तेजोमय सुंदर प्रकाशवान सूर्य पुत्राला जन्म देते. ॥5॥
Subject
रात्र आणि दिवस जगाचे रक्षण करतात, यावषियी -