Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 47

97 Mantra
33/47
Devata- विश्वेदेवा देवताः Rishi- कुत्सीदिर्ऋषिः Chhand- स्वराडार्षी गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
अधि॑ नऽ इन्द्रैषां॒ विष्णो॑ सजा॒त्यानाम्। इ॒ता मरु॑तो॒ऽ अश्वि॑ना।तं प्र॒त्नथा॑। अ॒यं वे॒नः। ये दे॒वासः॑। आ न॒ऽइडा॑भिः।विश्वे॑भिः सो॒म्यं मधु॑। ओमा॑सश्चर्षणीधृतः॥४७॥

अधि। नः॒। इ॒न्द्र॒। ए॒षा॒म्। विष्णो॒ऽइति॒ विष्णो॑। स॒जा॒त्या᳖ना॒मिति॑ सऽजा॒त्या᳖नाम्। इ॒त। मरु॑तः। अश्वि॑ना ॥४७ ॥

Mantra without Swara
अधि नऽइन्द्रेषाँविष्णो सजात्यानाम् । इता मरुतोऽअश्विना । तम्प्रत्नथाऽअयँवेनो ये देवासऽआ नऽइडाभिर्विश्वेभिः सोम्यम्मध्वोसश्चर्षणीधृतः॥

अधि। नः। इन्द्र। एषाम्। विष्णोऽइति विष्णो। सजात्यानामिति सऽजात्यानाम्। इत। मरुतः। अश्विना॥४७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (इन्द्र) परमैश्‍वर्यदाता विद्वान महोदय, हे (विष्णो) व्यापक ईश्‍वर, हे (मरुतः) मनुष्यांनो आणि हे (अश्‍विना) अध्यापक उपदेशक जनहो, आपण सर्वजण (सजात्यानाम्) आमचे सहकारी मित्र, संबंधी आदीकडे) (एषाम्) या (नः) आमच्या सर्व लोकांकडे (अधि) स्वामी वा रक्षक-पालक म्हणून (इत) या (अथवा वेळ पडल्यास आम्हाला त्या रूपाने व्हा) ॥47॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ईश्‍वर जसा पक्षपात सोडून सर्वांना समदृष्टीने पाहतो, तसे जे विद्वान निःपक्षपात दृष्टीने, आमच्याकडे पाहतात, आम्हीही त्यांशी त्याच प्रकारे वागावे. ॥47॥
Subject
मनुष्यांनी काय करावे, याविषयी -
Footnote
(टीप) - या मंत्रात ‘ तम्प्रत्नथा’ पासून ते ‘चर्षणीघृत’ पर्यंतचे शब्द पूर्वी अ.७ मंत्र १२/१६/१९ आणि अ.३३ मंत्र ३४/१० आणि अ. ७ मंत्र ३३ या मंत्रात आले आहेत. त्यांचा अर्थ पूर्वीच्या ठिकाणी दिला आहे. इथे या शब्दांची पुनरूक्ती कर्मकांडाच्या पूर्ततेसाठी केलेली आहे)