Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 43

97 Mantra
33/43
Devata- सूर्यो देवता Rishi- हिरण्यस्तूप ऋषिः Chhand- विराट् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
आ कृ॒ष्णेन॒ रज॑सा॒ वर्त्त॑मानो निवे॒शय॑न्न॒मृतं॒ मर्त्यं॑ च।हि॒र॒ण्यये॑न सवि॒ता रथे॒ना दे॒वो या॑ति॒ भुव॑नानि॒ पश्य॑न्॥४३॥

आ। कृ॒ष्णेन॑। रज॑सा। वर्त्त॑मानः। नि॒वे॒शय॒न्निति॑ निऽवे॒शय॑न्। अ॒मृत॑म्। मर्त्य॑म्। च॒ ॥ हि॒र॒ण्यये॑न। स॒वि॒ता। रथे॑न। आ। दे॒वः। या॒ति॒। भुव॑नानि। पश्य॑न् ॥४३ ॥

Mantra without Swara
आ कृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्नमृतम्मर्त्यञ्च । हिरण्ययेन सविता रथेना देवो याति भुवनानि पश्यन् ॥

आ। कृष्णेन। रजसा। वर्त्तमानः। निवेशयन्निति निऽवेशयन्। अमृतम्। मर्त्यम्। च॥ हिरण्ययेन। सविता। रथेन। आ। देवः। याति। भुवनानि। पश्यन्॥४३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, हा ज्योतिस्वरूप सूर्य (कृष्णेन) अन्य ग्रह-उपग्रहांशी आकर्षण शक्ती द्वारा संबद्ध असून (रजसा) अंतरिक्षातील प्रत्येक लोकासद्व (आ, वर्तमान) विद्यमान आहे. सूर्य आपल्या भ्रमणकक्षेत वारंवार फिरत (भुवनानि) सर्व लोक लोकांतराना (पश्यन्) (पाहत म्हणजे त्यांच्यासह विद्यमान राहून) अथवा सर्वाना सर्व जणांचे दर्शन घडविणारा आहे. हा (देवः) स्वतः प्रकाशमान (सविता) सूर्यदेव (अमृतम्) जलाला अथवा आकाश आदी कारणरूपाने अविनाशी पदार्थांना (व) आणि (मत्यम्) भरणधर्मा प्राणिमात्राला (निवेशयन्) आपापल्या प्रदेशात स्थापित करीत (आ, याति) उदय-अस्त वेळी येतो आणि जातो या सूर्यलोकाच्या उत्पादक परमेश्‍वर आहे (हे ध्यानात घ्या) ॥43॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यहो, ज्याप्रमाणे या भूगोल आदी लोकांशी सूर्याचा आकर्षणशक्तीद्वारे संबंध आहे, तो अमृतरूप जलाची वर्षा करतो आणि तोच सर्व मूर्त वा आकारवान वस्तूंचे दर्शन घडवितो, त्याचप्रमाणे सूर्य आदी लोकदेखील ईश्‍वरानेच आकर्षणाद्वारे स्थित वा स्थापित केले आहेत, हे सर्वांनी जाणून घ्यावे. ॥43॥
Subject
ते सूर्यमण्डल कसे आहे, याविषयी -