Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 4

97 Mantra
33/4
Devata- अग्निर्देवता Rishi- विश्वरूप ऋषिः Chhand- निचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
यु॒क्ष्वा हि दे॑व॒हूत॑माँ॒२ऽअश्वाँ॑२ऽअग्ने र॒थीरि॑व।नि होता॑ पू॒र्व्यः स॑दः॥४॥

यु॒क्ष्व। हि। दे॒व॒हूत॑मा॒निति॑ देव॒ऽहूत॑मान्। अश्वा॑न्। अ॒ग्ने॒। र॒थीरि॒वेति॑ र॒थीःऽइ॑व ॥ नि। होता॑। पू॒र्व्यः। स॒दः॒ ॥४ ॥

Mantra without Swara
युक्ष्वा हि देवहूतमाँऽअश्वाँ अग्ने रथीरिव । नि होता पूर्व्यः सदः ॥

युक्ष्व। हि। देवहूतमानिति देवऽहूतमान्। अश्वान्। अग्ने। रथीरिवेति रथीःऽइव॥ नि। होता। पूर्व्यः। सदः॥४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ -हे (अग्ने) विद्वान, आपण (रथीरिव) सारथीप्रमाणे (देवहूतमान्) विद्वानांद्वारे प्रार्थना केल्यानंतर (अश्‍वाज्) शीघ्रगामी वाहनावर स्वार होऊन वा रथात घोडे (युक्ष्व) जुंपून इकडे या. (पूर्व्यः) पूर्वज विद्वानांकडून जी विद्या आपण प्राप्त केली आहे, (होता) ती अधिक वाढवीत अथवा आम्हा सर्वांना ती विद्या प्रदान करीत आपण (या आमच्या नगरीत वा आश्रमात) (हि) अवश्यमेव (नि, सदः) स्थायीपणे वास्तव्य करा. महान प्रख्यात विद्वानाला ग्रामस्थ जन त्यांच्या गावी राहून उपदेश देण्याविषयी प्रार्थना करीत आहेत-असा प्रसंग कल्पित करता येतो)॥4॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे एक उत्तम प्रशिक्षणप्राप्त सारथी घोड्यांद्वारे अनेक कामें पूर्ण करून घेतो, तद्वत विद्वानांनी (वैज्ञानिकांनी) अग्नी आदी पदार्थांपासून अनेक कार्यें पूर्ण करून घ्यावीत. ॥4॥
Subject
पुनश्‍च, तोच विषय -