Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 38

97 Mantra
33/38
Devata- सूर्यो देवता Rishi- कुत्स ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
तन्मि॒त्रस्य॒ वरु॑णस्याभि॒चक्षे॒ सूर्य्यो॑ रू॒पं कृ॑णुते॒ द्योरु॒पस्थे॑। अ॒न॒न्तम॒न्यद्रुश॑दस्य॒ पाजः॑ कृ॒ष्णम॒न्यद्ध॒रितः॒ सं भ॑रन्ति॥३८॥

तत्। मि॒त्रस्य॑। वरु॑णस्य। अ॒भि॒चक्ष॒ऽइत्य॑भि॒चक्षे॑। सूर्य्यः॑। रू॒पम्। कृ॒णु॒ते॒। द्योः। उ॒पस्थ॒ऽइत्यु॒पस्थे॑ ॥ अ॒न॒न्तम्। अ॒न्यत्। रुश॑त्। अ॒स्य॒। पाजः॑। कृ॒ष्णम्। अ॒न्यत्। ह॒रितः॑। सम्। भ॒र॒न्ति॒ ॥३८ ॥

Mantra without Swara
तन्मित्रस्य वरुणस्याभिचक्षे सूर्या रूपङ्कृणुते द्योरुपस्थे । अनन्तमन्यद्रुशदस्य पाजः कृष्णमन्यद्धरितः सम्भरन्ति ॥

तत्। मित्रस्य। वरुणस्य। अभिचक्षऽइत्यभिचक्षे। सूर्य्यः। रूपम्। कृणुते। द्योः। उपस्थऽइत्युपस्थे॥ अनन्तम्। अन्यत्। रुशत्। अस्य। पाजः। कृष्णम्। अन्यत्। हरितः। सम्। भरन्ति॥३८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, तो परमात्मा (द्योः) प्रकाश लोकाजवळ (अर्थात अति अत्यंत दूर पर्यंतही विद्यमान आहे, जो (उपस्ये) अंधकारापासून भिन्न म्हणजे प्रकाशरूप आहे. तो (सूर्यः) चर-अचर जगाचा आत्मा (मित्रस्य) प्राण आणि (वरूणस्य) उदान वायूच्या (तत्) त्या (रूपम्) रूपाची (कृणुते) रचना करतो (प्राण्यांना प्राण, उदानादी वायू व पंचभूतमय शरीर देऊन जीवांना जीवन देतो) आणि या मुळेच मनुष्य (अभिचक्षे) सर्वजण पाहतो आणि जाणतो. (अस्य) असा हा परमेश्‍वर (रूशत) शुद्धस्वरूप आणि (पाजः) बळीचा (अनन्तम्) अपरिमित भंडार असून तो (अन्यत्) या जीव व प्रकृतीपेक्षा भिन्न आहे. तो (अन्यत्) (कृष्णाम्) अविदय आदी दुर्गूणयुक्त आणि त्याहून वेगळ्या अशा जगाला आणि (हरितः) सर्व दिशांना (सन्भरचि) धारण करतो. ॥38॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, जो अनंत ब्रह्म आहे, तो प्रकृती व जीवात्म्याहून भिन्न आहे. तो प्रकृती रूप कारण असल्यामुळे विभु आहे. त्यापासून जे जे उत्पन्न होते, समाप्तीची वेळ आल्यानंतर ते ते ईश्‍वराच्या नियमाप्रमाणे नष्ट होते. (अर्थात् सृष्टीत आधी वा वर्तमानकाळात जे जे उत्पन्न होते, ते मधेच अथवा प्रलयकाळी नष्ट होते.) ज्याप्रमाणे जीव प्राण व उदास वायूद्वारे सर्व व्यवहार पूर्ण करतात. त्याप्रमाणे ईश्‍वर आपल्या अनंत सामर्थ्याद्वारे या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करतो. ॥38॥
Subject
पुन्हा त्या विषयी -