Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 36

97 Mantra
33/36
Devata- सूर्यो देवता Rishi- प्रस्कण्व ऋषिः Chhand- निचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
त॒रणि॑र्वि॒श्वद॑र्शतो ज्योति॒ष्कृद॑सि सूर्य्य।विश्व॒मा भा॑सि रोच॒नम्॥३६॥

त॒रणिः॑। वि॒श्वद॑र्शत॒ इति॑ वि॒श्वऽद॑र्शतः। ज्यो॒ति॒ष्कृत्। ज्यो॒तिः॒कृदिति॑ ज्योतिः॒ऽकृत्। अ॒सि॒। सू॒र्य्य॒ ॥ विश्व॑म्। आ। भा॒सि॒। रो॒च॒नम् ॥३६ ॥

Mantra without Swara
तरणिर्विश्वदर्शतो ज्योतिष्कृदसि सूर्य । विश्वमा भासि रोचनम् ॥

तरणिः। विश्वदर्शत इति विश्वऽदर्शतः। ज्योतिष्कृत्। ज्योतिःकृदिति ज्योतिःऽकृत्। असि। सूर्य्य॥ विश्वम्। आ। भासि। रोचनम्॥३६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (सूर्य) सूर्याप्रमाणे तेजस्वी राजपुरुष, ज्याप्रमाणे (तरणिः) अंधकाराला दूर लोटणारा (विश्‍वदर्शतः) सर्वांना पाहण्याची शक्ती देणारा (ज्योतिष्कृत्) अग्नी, विद्युत, चंद्र, नक्षत्र, ग्रह, तारका या सर्वांना प्रकाश देणारा सूर्य (रोचनम्) प्रभासित होतो आणि (विश्‍वम्) विश्‍वाला प्रकाशित करतो, तसे राजपुरुष, आपण संपूर्ण राज्याला प्रकाशित करणारे सर्वांना प्रेरणा देणारे (असि) आहात. आपण जसे न्याय आणि विनम्रतेने राज्याचे (आ, भासि) संचालन करता, त्यामुळे आपण सर्व प्रजाजनांच्या सत्काराला पात्र आहात. ॥36॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जे राजपुरुष विद्या-प्रसारक असतात, ते सर्वांना आनंदित करण्यास समर्थ असतात. ॥36॥
Subject
आता राजपुरुष कसे असावेत, याविषयी -