Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 33

97 Mantra
33/33
Devata- विद्वान् देवता Rishi- प्रस्कण्व ऋषिः Chhand- निचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
दैव्या॑वध्वर्यू॒ऽआ ग॑त॒ꣳ रथे॑न॒ सूर्य॑त्वचा।मध्वा॑ य॒ज्ञꣳ सम॑ञ्जाथे।तं प्रत्नथा॑। अ॒यं वेनः। चित्रं दे॒वाना॑म्॥३३॥

दैव्यौ॑। अ॒ध्व॒र्यू॒ऽइत्य॑ध्वर्यू। आ। ग॒त॒म्। रथे॑न। सूर्य॑त्व॒चेति॒ सूर्य॑त्वचा ॥ मध्वा॑। य॒ज्ञम्। सम्। अ॒ञ्जा॒थे॒ऽ इत्य॑ञ्जाथे ॥३३ ॥

Mantra without Swara
दैव्यावध्वर्यूऽआगतँ रथेन सूर्यत्वचा । मध्वा यज्ञँ समञ्जाथे । तम्प्रत्नथा । अयँवेनश्चित्रन्देवानाम्॥

दैव्यौ। अध्वर्यूऽइत्यध्वर्यू। आ। गतम्। रथेन। सूर्यत्वचेति सूर्यत्वचा॥ मध्वा। यज्ञम्। सम्। अञ्जाथेऽ इत्यञ्जाथे॥३३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (दैव्यौ) दोन उत्तम विद्वानहो अथवा दिव्य गुणांनी संपन्न अशा (अर्ध्वयू) अहिंसारुपयज्ञाची इच्छा करणार्‍या हे दोन पुरुषहो, तुम्ही (सूर्यत्वचा) ज्या यानाची बाहेरील बाजू म्हणजे त्वचा सूर्याप्रमाणे चमकणारी आहे, त्या (रथेन) उडणार्‍या विमान आदी यानाने (आ, गतम्) इथे या आणि (मद्वा) मधुर वा पौष्टिक सामग्री-साहित्याद्वारे (यज्ञम्) यात्रा पूर्ण करा अथवा युद्ध करा वा हवन करून (सम्, अत्ताये) यात्रा, संग्राम आणि यज्ञ यांना पूर्ण करा ॥33॥
Essence
भावार्थ - राजा आदी मनुष्यांचे कर्तव्य आहे की त्यानी सूर्यप्रकाशाप्रमाणे दीप्तिमान विमान आदी यानांचे निर्माण करून यात्रा, युद्ध आदी अनेक व्यवहार संपन्न करावेत. ॥33॥
Subject
पुनश्‍च, तोच विषय -
Footnote
(तळटीप) ‘तं प्रत्नथा’ ही प्रतीके पूर्वी अ. न.७ मंत्र १२/१६/४२ मधे आली आहेत. त्यांचा अर्थ इथे दिला नाही. तो तिथे पहावा)