Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 31

97 Mantra
33/31
Devata- सूर्यो देवता Rishi- प्रस्कण्व ऋषिः Chhand- निचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
उदु॒ त्यं जा॒तवे॑दसं दे॒वं व॑हन्ति के॒तवः॑।दृ॒शे विश्वा॑य॒ सूर्य्य॑म्॥३१॥

उँ॒ऽइत्युँ॑त्। उ। त्यम्। जा॒तवे॑दस॒मिति॑ जा॒तऽवे॑दसम्। दे॒वम्। व॒ह॒न्ति॒। के॒तवः॑ ॥ दृ॒शे। विश्वा॑य। सूर्य्य॑म् ॥३१ ॥

Mantra without Swara
उदु त्यञ्जातवेदसन्देवँ वहन्ति केतवः । दृशे विश्वाय सूर्यम् ॥

उँऽइत्युँत्। उ। त्यम्। जातवेदसमिति जातऽवेदसम्। देवम्। वहन्ति। केतवः॥ दृशे। विश्वाय। सूर्य्यम्॥३१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (जातवेदसम्) उत्पन्न सर्व पदार्थांवर (देवम्) चमकणार्‍या (आपल्या प्रकाशाने पदार्थांना दर्शनीय करणार्‍या) (सूर्य्यम्) सूर्यमंडळाला (केतवः) त्याची किरणें (विश्‍वाम्) (दृशे) सर्वाना संसाराचे दर्शन घडविण्यासाठी (उत्, वहन्ति) वरच्या दिशेला मोठ्या अद्भुतरीत्या नेतात (त्वम्) त्या सूर्याला (उ) अवश्यमेव तुम्ही लोक पूर्णपणे जाणून घ्या. ॥31॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जसा सूर्य सर्वांना जग दाखवितो आणि स्वतःही प्रकाशित सुशोभित होतो, तद्वत विद्वज्जनांनी सर्वांना विद्या, सुशिक्षा द्यावी व त्याद्वारे स्वतःही सुशोभित वा कीर्तीवंत व्हावे.॥31॥
Subject
तो सूर्य (वा सूर्यमंडळ) कसा आहे. याविषयी -