Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 3

97 Mantra
33/3
Devata- अग्निर्देवता Rishi- गोतम ऋषिः Chhand- निचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
यजा॑ नो मि॒त्रावरु॑णा॒ यजा॑ दे॒वाँ२ऽऋ॒तं बृ॒हत्।अग्ने॒ यक्षि॒ स्वं दम॑म्॥३॥

यज॑। नः॒। मि॒त्रावरु॑णा। यज॑। दे॒वान्। ऋ॒तम्। बृ॒हत् ॥ अग्ने॑। यक्षि॑। स्वम्। दम॑म् ॥३ ॥

Mantra without Swara
यजा नो मित्रावरुणा यजा देवाँऽऋतम्बृहत् । अग्ने यक्षि स्वन्दमम् ॥

यज। नः। मित्रावरुणा। यज। देवान्। ऋतम्। बृहत्॥ अग्ने। यक्षि। स्वम्। दमम्॥३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) विद्वान महोदय, आपण (नः) आमचे (मित्रावरूणा) मित्रांचा आणि श्रेष्ठजनांचा तसेच (देवान्) विद्वान जनांचा (यज) सत्कार-सम्मान करा. तसेच (बृहत्) महान (ऋतम्) सत्याचा (यज) आम्हा (सामान्यजनांना आणि आम्हासह असलेल्या या मित्रांचा, विद्वानांना उपदेश करा. याप्रमाणे (स्वम्) आपण आपल्या (दमम्) घराला (यक्षि) संगती वा सत्संगाचे स्थळ होऊ द्या (अशी आम्ही सामान्यजन, जे आपल्या मित्र आणि विद्वानांसह आपल्या घराकडे आले आहेत, आपणास प्रार्थना करीत आहोत.) ॥3॥
Essence
भावार्थ - हे विद्वान मनुष्यहो, आपण आमच्या मित्रांचा, श्रेष्ठजनांचा आणि विद्वानांचा सत्कार करून सत्योपदेशक व्हा आणि आपले गृहकृत्य (आतिथय वा अतिभियज्ञ) करणारे व्हा. ॥3॥
Subject
विद्वान मनुष्यांनी काय केले पाहिजे, या विषयी -