Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 27

97 Mantra
33/27
Devata- इन्द्रो देवता Rishi- अगस्त्य ऋषिः Chhand- विराट् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
कुत॒स्त्वमि॑न्द्र॒ माहि॑नः॒ सन्नेको॑ यासि सत्पते॒ किं त॑ऽइ॒त्था।सं पृ॑च्छसे समरा॒णः शु॑भा॒नैर्वो॒चेस्तन्नो॑ हरिवो॒ यत्ते॑ऽअ॒स्मे।म॒हाँ२ऽ इन्द्रो॒ यऽओज॑सा।क॒दा च॒न स्त॒रीर॑सि॒। क॒दा च॒न प्रयु॑च्छसि॥२७॥

कुतः॑। त्वम्। इ॒न्द्र॒। माहि॑नः। सन्। एकः॑। या॒सि॒। स॒त्प॒त॒ इति॑ सत्ऽपते। किम्। ते॒। इ॒त्था ॥ सम्। पृ॒च्छ॒से॒। स॒म॒रा॒ण इति॑ सम्ऽअरा॒णः। शु॒भा॒नैः। वोचेः। तत्। नः॒। ह॒रि॒व॒ इति॑ हरिऽवः। यत्। ते॒। अ॒स्मेऽइत्य॒स्मे ॥२७ ॥

Mantra without Swara
कुतस्त्वमिन्द्र माहिनः सन्नेको यासि सत्पते किन्तऽइत्था । सम्पृच्छसे समराणः शुभानैर्वोचेस्तन्नो हरिवो यत्तेऽअस्मे । महाँऽइन्द्रो यऽओजसा कदा चन स्तरीरसि कदा चन प्रयुच्छसि॥

कुतः। त्वम्। इन्द्र। माहिनः। सन्। एकः। यासि। सत्पत इति सत्ऽपते। किम्। ते। इत्था॥ सम्। पृच्छसे। समराण इति सम्ऽअराणः। शुभानैः। वोचेः। तत्। नः। हरिव इति हरिऽवः। यत्। ते। अस्मेऽइत्यस्मे॥२७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सुसंस्कृत सभ्य प्रजाजनांचे वचन राजाप्रत) (सत्पते) सत्यपालक, सद्व्यवहारकर्ता व श्रेष्ठ पुरूषांचे रक्षक हे (इन्द्र) सभापती (वा राजन्) (माहिनः) आपण महिमामय आहात, मग (त्वम्) आपण एकाकी (सन्) असून अशाप्रकारे एकटे (कुः) का (यासि) आहांत? (आपण सहकार्‍यांसह व राजपुरूषांसह त्यांच्या सुरक्षा-व्यवस्थेत असावयास हवे. आपण असे एकटे का फिरत आहात, हे आम्हांस सांगा) (किम्)ते) (इत्था) अशाप्रकारे एकटे येण्यात आपले काय प्रयोजन आहे? हे (हरिवः) प्रशंसनीय मनोहर अश्‍व (आदी पशूंचे स्वामी) राजन्, (यत्) ज्याअर्थी (अस्मे) आम्ही सर्व (ते) आपलीच माणसें आहोत, त्यामुळे (समराणः) सम्यकप्रकारे प्रवास करणारे आपण (नः) आम्हाला (सम्, पृजच्छसे) (निःसंकोचपणे अवश्य ते सर्व) विचारू शकता. कृपाकरून (शुभानैः) मंगलमय वाणीने (वोचेः) सांगा की (तत्) आपले एकाची राहण्याचे ते कारण काय आहे? ॥27॥
Essence
भावार्थ - राजपुरूषांनी तसेच प्रजाजनांनी सभाध्यक्ष राजाला सांगायला पाहिजे की हे सभाध्यक्ष, आपण कोणा सहायक (मंत्री, अमात्य, राजपुरूष आदी) च्या सहाय वा मंत्रणाशिवाय राज्यकार्य करू नये. (एकट्याने निर्णय घेऊ नये) या व्यतिरिक्त आपणांसाठी हे उचित आहे की आपण सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन या कार्यात आमच्या सहाय्य अवश्य घ्यावे. सदाचारी आणि सुसभ्य आम्ही आहोत, म्हणून आमच्या सम्मती वा मत जाणून घेत जा आणि प्रजेची रक्षा करा. ॥27॥
Subject
पुन्हा तोच विषय -
Footnote
(तळटीप - या मंत्रात ‘महाँ२ऽ इन्द्रो य ओजसा ’ ‘ कदाचन स्तरीरसि) ही तीन प्रतीकें अध्याय ७|४०॥ अ. ८/२/३ मधे सांगितलेल्या क्रमाने आली आहेत. यांचा उल्लेख येथे कोणत्या तरी विशेष कर्मकांडासाठी केलेला आहे. त्यामुळे इथे या प्रतीकांचा अर्थ दिलेला नाही. इच्छुकांनी अर्थ त्या त्या ठिकाणीं पाहून घ्यावा)