Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 21

97 Mantra
33/21
Devata- वेनो देवता Rishi- सुनीतिर्ऋषिः Chhand- निचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
आ सु॒ते सि॑ञ्चत॒ श्रिय॒ꣳ रोद॑स्योरभि॒श्रिय॑म्।र॒सा द॑धीत वृष॒भम्। तं प्र॒त्नथा॑। अ॒यं वे॒नः॥२१॥

आ। सु॒ते। सि॒ञ्च॒त॒। श्रिय॑म्। रोद॑स्योः। अ॒भि॒श्रिय॒मित्य॑भि॒ऽश्रिय॑म् ॥ र॒सा। द॒धी॒त॒। वृ॒ष॒भम् ॥२१ ॥

Mantra without Swara
आ सुते सिञ्चत श्रियँ रोदस्योरभिश्रियम् । रसा दधीत वृषभम् तम्प्रत्नथायँवेन्॥

आ। सुते। सिञ्चत। श्रियम्। रोदस्योः। अभिश्रियमित्यभिऽश्रियम्॥ रसा। दधीत। वृषभम्॥२१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (टीप - राज्याभिषेकप्रसंगी पुरोहिताची उक्ती. असा प्रसंग वा विश्रान या मंत्राविषयी कल्पिता येते) (रसा) आनंददायक (वा या आनंदउत्सवात सहभागी झालेल्या प्रजाजनहो) तुम्ही (सुते) या उत्पन्न झालेल्या जगात (वृषभम्) अतिबली तसेच (रोदस्योः) आकाश आणि पृथ्वीला (अभिश्रियम्) सर्वप्रकारे सुंदर व सुखकर करणार्‍या या (श्रियम्) सभापती राजाचा (आ, सिञ्चत) सुंदररीत्या अभिषेक करा आणि त्या सभापतीनेही तुमचे (दधीत) धारण करावे. (न्यायाने, प्रेमाने परिपालन करावे, मी शुभवचन सांगत आहे)
Essence
भावार्थ - मनुष्यांसाठी (प्रजाजनांसाठी) हे उचित आहे की त्यांनी राज्याची उन्नती करणार्‍या, राज्यप्रकाशक, सौन्दर्य आणि गुणांनी अलंकृत, अतिबलवान, शूरवीर आणि पूर्ण अवयव असलेल्या मनुष्याचा राजा म्हणून अभिषेक करावा आणि त्या राजाचेही कर्तव्य आहे ती त्याने प्रजेला सुख आनंद द्यावा. ॥21॥
Subject
पुनश्‍च तोच विषय -
Footnote
(तळटीप) - तं प्रत्नथा । अयं वेनः॥ हे दोन प्रतीक अ. ७ मंत्र १२/१६ चे असून याठिकाणी कर्म कांडासाठी दिले आहेत. अर्थ तिथे पहावा)