Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 2

97 Mantra
33/2
Devata- अग्नयो देवताः Rishi- विश्वरूप ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
हर॑यो धू॒मके॑तवो॒ वात॑जूता॒ऽउप॒ द्यवि॑।यत॑न्ते॒ वृथ॑ग॒ग्नयः॑॥२॥

हर॑यः। धू॒मके॑तव॒ इति॑ धू॒मऽके॑तवः। वात॑जूता॒ इति वात॑ऽजूताः। उप॑। द्यवि॑ ॥ यत॑न्ते। वृथ॑क्। अ॒ग्नयः॑ ॥२ ॥

Mantra without Swara
हरयो धुमकेतवो वातजूताऽउप द्यवि । यतन्ते वृथगग्नयः ॥

हरयः। धूमकेतव इति धूमऽकेतवः। वातजूता इति वातऽजूताः। उप। द्यवि॥ यतन्ते। वृथक्। अग्नयः॥२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ : हे मनुष्यांनो, या जगात (धूमकेतवः) धूर हेच ज्यांची पताका आहे, असा अग्नी (वातजूताः) वायूमुळे तेज आणि तीव्रत्व प्राप्त करतो (वार्‍यामुळे अग्नी अधिक प्रकाशमान होतो व लवकर पसरतो) (हरयः) हरणशील (विनाशक वा जलशोषक) (अग्नयः) अग्नी , वायू, विद्युत आपल्या (पृथक) नाना प्रकारच्या रूपाने (द्यवि) मनुष्याला प्रकाश व उष्णता देण्याला (उप, यतन्ते) प्रयत्न करतात, तुम्ही त्या शक्तींना आपल्या कार्यसिद्धीसाठी उपयोगात आणा ॥2॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, ज्याचे ज्ञान करण्याचे साधन धूर आहे, जो दाहक आहे आणि ज्यात हरणशीलता (शोषण, गती) आहे ते सर्व पदार्थ अग्नी आहेत, असे जाणा (वायू, विद्यूत देखील एका प्रकारे अग्नी आहेत) ॥2॥
Subject
पुन्हा त्याच विषयी -