Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 15

97 Mantra
33/15
Devata- अग्निर्देवता Rishi- प्रस्कण्व ऋषिः Chhand- बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
श्रु॒धि श्रु॑त्कर्ण॒ वह्नि॑भिर्दे॒वैर॑ग्ने स॒याव॑भिः। आ सी॑दन्तु ब॒र्हिषि॑ मि॒त्रोऽअ॑र्य्य॒मा प्रा॑त॒र्यावा॑णोऽअध्व॒रम्॥१५॥

श्रु॒धि। श्रु॒त्क॒र्णेति॑ श्रुत्ऽकर्ण। वह्नि॑भि॒रिति॒ वह्नि॑ऽभिः। दे॒वैः। अ॒ग्ने॒। स॒याव॑भि॒रिति॑ स॒याव॑ऽभिः ॥ आ। सी॒द॒न्तु॒। ब॒र्हिषि॑। मि॒त्रः। अ॒र्य्य॒मा। प्रा॒त॒र्यावा॑णः। प्रा॒त॒र्यावा॑न॒ इति॑ प्रातः॒ऽयावा॑नः। अ॒ध्व॒रम् ॥१५ ॥

Mantra without Swara
श्रुधि श्रुत्कर्ण वह्निभिर्देवैरग्ने सयावभिः । आसीदन्तु बर्हिषि मित्रोऽअर्यमा प्रातर्यावाणोऽअध्वरम् ॥

श्रुधि। श्रुत्कर्णेति श्रुत्ऽकर्ण। वह्निभिरिति वह्निऽभिः। देवैः। अग्ने। सयावभिरिति सयावऽभिः॥ आ। सीदन्तु। बर्हिषि। मित्रः। अर्य्यमा। प्रातर्यावाणः। प्रातर्यावान इति प्रातःऽयावानः। अध्वरम्॥१५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (श्रुत्कर्ण) (वाद अथवा तक्रार घेऊन येणार्‍या) प्रार्थीजनांचे म्हणजे ऐकणारे (अग्ने) हे अग्निसम तेजस्वी राजा अथवा विद्वान महोदय, आपण (सयावभिः) सोबत असरार्‍या (मंत्री आदी अधिकार्‍यांसह-विद्वनांसह)(वह्निभिः) कार्य पूर्ण करणारे आहात. आपण (देवौः) विद्वानांसह (अध्वरम्) राज्याच्या आवश्यक व्यवहाराविषयी (लोकांचे म्हणणे, निवेदन वगैरे) (श्रुधि) ऐका. तसेच (प्रातर्यावाणः) आपण प्रातःकालीन राज्यकार्य त्वरित पूर्ण करणारे असून (मित्रः) सर्वांचे मित्र आणि (अर्यमा) वैश्यांची अथवा आपल्या अधिकारी व्यवस्थापक लोकांची सत्य व यथार्थ मंत्रणा ऐकता. आपण व वरील मंत्री आदी सर्वजण (बर्हिषि) अंतरिक्षसम विशाल राजसभाभवनात (आ, सीदन्तु) येऊन स्थानापन्न व्हा (असे मी राजपुरोहित आपणास विनंती करीत आहे) ॥15॥
Essence
भावार्थ - सभापती राजाचे कर्तव्य आहे की त्याने चांगले सुपरीक्षित मंत्री नेमावेत आणि त्यांच्यासह सभेत बसून वाद अथवा तक्रार घेऊन येणार्‍या लोकांचे म्हणणे ऐकावे. आणि त्यावर विचार करून योग्य न्याय द्यावा ॥15॥
Subject
आता पुढील मंत्रात राजधर्मा विषयी -