Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 10

97 Mantra
33/10
Devata- अग्निर्देवता Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- विराड् गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
विश्वे॑भिः सो॒म्यं मध्वग्न॒ऽइन्द्रे॑ण वा॒युना॑।पिबा॑ मि॒त्रस्य॒ धाम॑भिः॥१०॥

विश्वे॑भिः। सो॒म्यम्। मधु॑। अग्ने॑। इन्द्रे॑ण। वा॒युना॑ ॥ पिब॑। मि॒त्रस्य॑। धाम॑भि॒रिति॒ धाम॑ऽभिः ॥१० ॥

Mantra without Swara
विश्वेभिः सोम्यम्मध्वग्नऽइन्द्रेण वायुना । पिबा मित्रस्य धामभिः ॥

विश्वेभिः। सोम्यम्। मधु। अग्ने। इन्द्रेण। वायुना॥ पिब। मित्रस्य। धामभिरिति धामऽभिः॥१०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) अग्नीप्रमाणे तेजस्वी विद्वान, जसा सूर्य (विश्‍वेभिः) समस्त (धामभिः) धामांतील (स्थान व प्रदेशातील) (इन्द्रेण) (वायुना) ऐश्‍वर्य व बलवान वायूच्या साह्याने (सोम्यम्) उत्तम औषधीचा (मधु) मधुर रस पितो, तसे आपण (मित्रस्य) या आमच्या रूपातील मित्रजनांनी दिलेला उत्तम औषधीचा रस (पिब) प्याः (घरी आलेल्या विद्वानाला मित्र मानून गृहस्थजनांनी श्रेष्ठ रसादी देऊन त्याचा आदर-सत्कार करावा)
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. हे मनुष्यांनो, जसा सूर्य सर्व पदार्थातील रस पुष्टिकारक करतो, तसे विद्वानांनी विद्या आणि विनयाने सर्वजनांना सुखी व आनंदित करावे. ॥10॥
Subject
पुनश्‍च तोच विषय -