Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 32 / Mantra 5

16 Mantra
32/5
Devata- परमेश्वरो देवता Rishi- स्वयम्भु ब्रह्म ऋषिः Chhand- भुरिक् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
यस्मा॑ज्जा॒तं न पु॒रा किं च॒नैव य आ॑ब॒भूव॒ भुव॑नानि॒ विश्वा॑।प्र॒जाप॑तिः प्र॒जया॑ सꣳररा॒णस्त्रीणि॒ ज्योती॑षि सचते॒ सः। षो॑ड॒शी॥५॥

यस्मा॑त्। जा॒तम्। न। पु॒रा। किम्। च॒न। ए॒व। यः। आ॒ब॒भूवेत्या॑ऽऽ ब॒भूव॑। भुव॑नानि। विश्वा॑ ॥ प्र॒जाऽप॑ति॒रिति॑ प्र॒जाऽप॑तिः। प्र॒जया॑ स॒ꣳर॒रा॒ण इति॑ सम्ऽररा॒णः। त्रीणि॑। ज्योती॑षि। स॒च॒ते॒। सः। षो॒ड॒शी ॥५ ॥

Mantra without Swara
यस्माज्जातन्न पुरा किञ्चनैव यऽआबभूव भुवनानि विश्वा । प्रजापतिः प्रजया सँरराणस्त्रीणि ज्योतीँषि सचते स ऐडशी ॥

यस्मात्। जातम्। न। पुरा। किम्। चन। एव। यः। आबभूवेत्याऽऽ बभूव। भुवनानि। विश्वा॥ प्रजाऽपतिरिति प्रजाऽपतिः। प्रजया सꣳरराण इति सम्ऽरराणः। त्रीणि। ज्योतीषि। सचते। सः। षोडशी॥५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (यस्मात्) ज्या परमेश्‍वरा (पुरा) पूर्वी (किम्, चन) काहीही (न, जातम्) उत्पन्न झाले नाही (तो नित्य असल्यामुळे त्याची उत्पत्ती शक्य नाही, आणि त्या नित्य सत्तेने उत्पत्ति केल्यानंतरच सृष्टीनिर्मिती झाली) (दः) तोच सर्व ठिकाणी (आबभूव) पूर्णतः विद्यमान आहे (विश्‍वा) त्याच्यामुळेच (सर्व) सर्व (भुवनानि) लोक-लोकांतर आपल्यातील पदार्थांचा आधार म्हणून विद्यमान आहेत. (सः व) तोच (षोडशी) सोळा कलायुक्त असून (प्रजया) प्रजा (म्हणजे सर्व चेतन-जड सृष्टी सह) (सम्, रवाण्) सम्यक् प्रकारे रमण करीत तो (प्रजापतिः) प्रजारक्षक परमात्मा (त्रीणि)तीन (ज्योतिंषि तेजोमय विद्युत, सूर्य चंद्ररूप प्रकाशमान ज्योतीना (सचते) सहयुक्त करतो (त्याच्या महिमेमुळेच सूर्य-चंद्र, विद्युत एकमेकाशी सहकार्य करीत कार्यरत आहेत) ॥5॥
Essence
भावार्थ - ईश्‍वर अनादि असल्यामुळे त्याच्याही आधी वा पूर्वी काही असू शकत नाही. तोच सर्व प्रजांमधे व्याप्त असून जीवांची कर्में पाहतो, त्यानुसार कर्मफळ देत न्याय करीत असतो. त्याने प्राण आदी सोळा वस्त्र निर्माण केल्यामुळे त्याला षोडशी म्हणतात. (प्राण, श्रद्धा, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, इंद्रियें, मन, अन्न, वीर्य, तप, मंत्र, कर्म, लोक आणि नाम) या षोडश कलांचा उल्लेख प्रश्‍नोपनिषद्मधे आहे. या सर्व षोडश वस्तूमय परमात्म्यामधे आहेत. त्यानेच त्यांचे निर्माण केले आहे आणि तोच यांचे पालन करतो ॥5॥
Subject
पुन्हा, त्याच विषयी -