Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 32 / Mantra 4

16 Mantra
32/4
Devata- आत्मा देवता Rishi- स्वयम्भु ब्रह्म ऋषिः Chhand- भुरिक् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
ए॒षो ह॑ दे॒वः प्र॒दिशोऽ नु॒ सर्वाः॒ पूर्वो॑ ह जा॒तः सऽ उ॒ गर्भे॑ऽ अ॒न्तः। सऽ ए॒व जा॒तः स ज॑नि॒ष्यमा॑णः प्र॒त्यङ् जना॑स्तिष्ठति स॒र्वतो॑मुखः॥४॥

ए॒षः। ह॒। दे॒वः। प्र॒दिश॒ इति॑ प्र॒ऽदिशः॑। अनु॑। सर्वाः॑। पूर्वः॑। ह॒। जा॒तः। सः। उँ॒ऽइत्यूँ॑। गर्भे॑। अ॒न्तरित्य॒न्तः ॥ सः। ए॒व। जा॒तः। सः। ज॒नि॒ष्यमा॑णः। प्र॒त्यङ्। जनाः॑। ति॒ष्ठ॒ति॒। सर्वतो॑मुख इति॑ स॒र्वतः॑ऽमुखः ॥४ ॥

Mantra without Swara
एषो ह देवः प्रदिशोनु सर्वाः पूर्वो ह जातः सऽउ गर्भेऽअन्तः । सऽएव जातः स जनिष्यमाणः प्रत्यङ्जनास्तिष्थति सर्वतोमुखः ॥

एषः। ह। देवः। प्रदिश इति प्रऽदिशः। अनु। सर्वाः। पूर्वः। ह। जातः। सः। उँऽइत्यूँ। गर्भे। अन्तरित्यन्तः॥ सः। एव। जातः। सः। जनिष्यमाणः। प्रत्यङ् । जनाः। तिष्ठति। सर्वतोमुख इति सर्वतःऽमुखः॥४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (जनाः) विद्वज्जन हो, (एषाः) हा (ह) प्रसिद्ध परमात्मा (देवः) उत्तम स्वरूप असून (सर्वाः) सर्व दिशा आणि (प्रदिशः) प्रदिशांमधे (अवु) व्याप्त आहे (सः) (उ) तोच (गर्भे) अंतः) मधे (पूर्वः) प्रथम कल्पाच्या आधी (प्रलयानंतर सृष्टि निर्मितीच्या आधी) (ह) प्रसिद्ध वा विद्यमान होता. तो त्यावेळी (जातः) सृष्टीरूपाने व्यक्त होत होता, (सःएव) तोच (जातः) प्रसिद्ध होता. (जनिष्यमाणः) अगामी कल्पांमधे तोच प्रकट वा व्यक्त होईल (कृष्ट्युत्पत्ती मुळे त्याचे अस्तित्व जाणवेल) (सर्वतोमुखः) सर्व दिशांकडे मुख आदी अवयव असलेला (लाक्षणिक अर्थ-निराकार असूनही, मुख आदी इद्रियांची कार्ये, (पाहणे, ऐकणे आदी) करीत (प्रत्यङ्) प्रत्येक पदार्थापर्यंत जाणारा वा तिथे असणारा अशा रूपात तो परमेश्‍वर (तिष्ठति) अचल सर्वत्र स्थिर विद्यमान आहे. हे मनुष्यांनो, तुम्ही तोच परमेश्‍वर तुमच्याकरिता उपासनीय आणि ज्ञातव्य आहे. ॥4॥
Essence
भावार्थ - पूर्वीच्या मंत्रात वर्णिलेला ईश्‍वर जगदुत्पत्ती करून त्या रूपात व्यक्त झालेला, सर्व दिशांत व्यापक इंद्रियांविना इंद्रियांची सर्व कार्यें करणारा, सर्वत्र व्याप्त असल्यामुळे सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थिर आहे. तो भूतकाळातील कल्प म्हणजे सृष्टिनिर्मितीच्या वेळी जगदुत्पत्तीसाठी क्रियाशील होतो, तोच ध्यानशील मनुष्यांसाठी ज्ञातव्य आहे. ध्यानाद्वारेच त्याला जाणून घेता येते, अन्य अध्यानशील मनुष्य त्याला जाणू शकत नाही. ॥4॥
Subject
पुन्हा, तोच विषय -