Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 32 / Mantra 3

16 Mantra
32/3
Devata- हिरण्यगर्भः परमात्मा देवता Rishi- स्वयम्भु ब्रह्म ऋषिः Chhand- निचृत् पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
न तस्य॑ प्रति॒माऽअस्ति॒ यस्य॒ नाम॑ म॒हद्यशः॑।हि॒र॒ण्य॒ग॒र्भऽइत्ये॒ष मा मा॑ हिꣳसी॒दित्ये॒षा यस्मा॒न्न जा॒तऽइत्ये॒षः॥३॥

न। तस्य॑। प्र॒ति॒मेति॑ प्रति॒ऽमा। अ॒स्ति॒। यस्य॑। नाम॑। म॒हत्। यशः॑ ॥ हि॒र॒ण्य॒ग॒र्भ इति॑ हिरण्यऽग॒र्भः। इति॑। ए॒षः। मा। मा॑। हि॒ꣳसी॒त्। इति॑। ए॒षा। यस्मा॑त्। न। जा॒तः। इति॑। ए॒षः ॥३ ॥

Mantra without Swara
न तस्य प्रतिमाऽअस्ति यस्य नाम महद्यशः।हिरण्यगर्भऽइत्येष मा मा हिꣳसीदित्येषा यस्मान्न जातऽइत्येषः॥

न। तस्य। प्रतिमेति प्रतिऽमा। अस्ति। यस्य। नाम। महत्। यशः॥ हिरण्यगर्भ इति हिरण्यऽगर्भः। इति। एषः। मा। मा। हिꣳसीत्। इति। एषा। यस्मात्। न। जातः। इति। एषः॥३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (यशः) कीर्तिकारक धर्ममय आचरण करणे हेच (यस्य) ज्या (महत्) पूजनीय परमेश्‍वराचे (नाम) श्रेष्ठ नामस्मरण आहे, तो (हिरण्यगर्भः) सूर्य, विद्युत आदी पदार्थांचा आधार (इति) असा आहे. (एषः) अंतर्यामी असल्यामुळे (मा) त्याने मला (मा, हिंसीत्) ताडना करू नये अथवा त्याने आपल्यापासून मला कधी विमुख करू नये (अशी मी इच्छा करतो) (इति) अशी (एषा) ही प्रार्थना करतो. (यस्मात्) ज्या अर्थी तो (न) (जातः) कधी जन्मला नाही, त्याअर्थी (इति) अर्थ असा की (एषः) हा परमात्माच उपासनीय आहे. (जन्मणार्‍या मरणार्‍या अनित्य मनुष्याची उपासना, करू नये) (तस्य) त्या परमेश्‍वराची (प्रतिमा) प्रतिमा, परिमाण नाही. त्याच्या समान कोणी नाही, तो अवधि वा आकारात येणार नाही. त्याची प्रतिकृती, मुर्ती वा आकृती (न, अस्ति) नाही. (नित्य निराकाराची प्रतिमा वा मूर्ती नाही व करताही येत नाही) ^अथवा - या मंत्राचा दुसरा पक्ष असा की (हिरण्यगर्भः) या वेदाच्या पंचेविसाव्या अध्यायातील 10 ते 13 मंत्रापर्यंत म्हणलेला अनुवाक (मा, मा, हिंसीत्) (इति) याचप्रमाणे (एषा) यह ऋचा बाराव्या अध्यायाचा 102 वा मंत्र आहे, आणि (यस्मान्न जातःइत्येषः) या आठव्या अध्यायाच्या 36/37 या दोन मंत्राचा अनुवाक (यस्य) ज्या परमेश्‍वराचे (नाम) प्रख्यात (महत्) महती (यशः) कीर्ति आहे, (तस्य) त्याची (प्रतिमा) प्रतिबिम्ब (चित्र) नाहीं ॥3॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, जो कधी शरीर धारण करीत नाही, ज्याचे कुठलेही वा कोणतेही परिणाम (मोजमाप) नाही, ज्याची सीमा नाही, ज्याच्या आज्ञेचे पालनही नामस्मरण आहे, उपासना करणार्‍यावर जो आग्रह करतो, वेदांच्या अनेक मंत्रात ज्याचे महत्त्व प्रतिसादले आहे, जे कधी मरत नाही, ज्याच्यात कोणतीही विकृती वा विनाश होत नाही, हे मनुष्यांनो, तुम्ही त्या परमेश्‍वराची उपासना निरंतर करा. जर अशा परमेश्‍वरापासून भिन्न अशा (देवी-देवतांची) उपासना कराल, तर या अशा पापकृत्यामुळे तुम्ही महान दुःख, क्लेशादी भोगाल व नष्ट व्हाल. ॥3॥
Subject
पुन्हा, तोच विषय -