Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 32 / Mantra 2

16 Mantra
32/2
Devata- परमात्मा देवता Rishi- स्वयम्भु ब्रह्म ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
सर्वे॑ निमे॒षा ज॑ज्ञिरे वि॒द्युतः॒ पुरु॑षा॒दधि॑।नैन॑मू॒र्द्ध्वं न ति॒र्य्यञ्चं॒ न मध्ये॒ परि॑ जग्रभत्॥२॥

सर्वे॑। नि॒मे॒षा इति॑ निऽमे॒षाः। ज॒ज्ञि॒रे॒। वि॒द्युत॒ इति॑ वि॒ऽद्युतः॑। पुरु॑षात्। अधि॑। न। ए॒न॒म्। ऊर्द्ध्वम्। न। ति॒र्य्यञ्च॑म्। न। मध्ये॑। परि॑। ज॒ग्र॒भ॒त् ॥२ ॥

Mantra without Swara
सर्वे निमेषा जज्ञिरे विद्युतः पुरुषादधि । नैनमूर्ध्वन्न तिर्यञ्चन्न मध्ये परिजग्रभत् ॥

सर्वे। निमेषा इति निऽमेषाः। जज्ञिरे। विद्युत इति विऽद्युतः। पुरुषात्। अधि। न। एनम्। ऊर्द्ध्वम्। न। तिर्य्यञ्चम्। न। मध्ये। परि। जग्रभत्॥२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, ज्या (विद्युतः) विशेषण प्रकाशन (प्रसिद्ध वा गुणवान) (पुरूषात्) पूर्ण परमेश्‍वरापासून (सर्वे) सर्व (निमेषाः) निमेष, कला, काष्ठा आदी कालाचे अवयव (क्षर, प्रहर, दिन, रात्र, पळ, घटिका आदी)(अधिजज्ञिरे) अधिकतर उत्पन्न झाले आहेत वा होतात (क्षण, निमेष, प्रहर, घटिका. आदी समयाचे विभाग परमेश्‍वराने निर्माण केले व मानवाला त्याचे ज्ञान दिले. ईश्‍वराने ते भाग-विभाग दिले नसते, तर मानवाला कालाचे विभाग करण्याची युक्ती सुचली नसती, हा आशय वाटतो) (एनम्) अशा त्या परमेश्‍वराच्या कोणीही (ऊर्ध्वम्) वर (न) नाही, (न) तसेच (तिर्यञ्चम्) तिरका वा सर्व दिशात विद्यमानही (न) नाही वा खाली नाही. (मध्ये) सर्वाच्या मधे आणि सर्व त्याच्यामधे असल्यामुळे (परि, जग्रभत्) सर्व दिशांतून तो सर्वांना ग्रहण करून विद्यमान आहे. हे मनुष्यांनो, तुम्ही त्या परमेश्‍वराचीच उपासना करा ॥2॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, ज्याने निर्मित केल्यामुळे काळाचे (वेळ व समयाचे) सर्व विभाग उत्पन्न जाले (त्याची उपासना करा) तसेच ज्याच्या विषयी असे म्हणता येत नाही की तो आमच्या खाली, मधे, वर, मागे, दूर वा जवळ आहे, कारण तो सर्वत्र असून पूर्णब्रह्म आहे, त्या पूर्णब्रह्माला तुम्ही योगाभ्यासाद्वारे जाणा आणि त्याचीच उपासना करा. ॥2॥
Subject
पुन्हा त्याच विषयी -