Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 32 / Mantra 16

16 Mantra
32/16
Devata- विद्वद्राजानौ देवते Rishi- श्रीकाम ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
इ॒दं मे॒ ब्रह्म॑ च क्ष॒त्रं चो॒भे श्रिय॑मश्नुताम्।मयि॑ दे॒वा द॑धतु॒ श्रिय॒मुत्त॑मां॒ तस्यै॑ ते॒ स्वाहा॑॥१६॥

इ॒दम्। मे॒। ब्रह्म॑। च॒। क्ष॒त्रम्। च॒। उ॒भेऽइत्यु॒भे। श्रिय॑म्। अ॒श्नु॒ताम्। मयि॑। दे॒वाः। द॒ध॒तु॒। श्रिय॑म्। उत्त॑मा॒मित्युत्ऽत॑माम्। तस्यै॑। ते॒। स्वाहा॑ ॥१६ ॥

Mantra without Swara
इदम्मे ब्रह्म च क्षत्रञ्चोभे श्रियमश्नुताम् । मयि देवा दधतु श्रियमुत्तमान्तस्यै ते स्वाहा ॥

इदम्। मे। ब्रह्म। च। क्षत्रम्। च। उभेऽइत्युभे। श्रियम्। अश्नुताम्। मयि। देवाः। दधतु। श्रियम्। उत्तमामित्युत्ऽतमाम्। तस्यै। ते। स्वाहा॥१६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे परमेश्‍वर, आपल्या कृपेने आणि हे विद्वान महोदय, आपल्या पुरूषार्थाने (स्वाहा) सत्य-आचरण रूप कर्माद्वारे (मे) मला (इदम्) हे (ब्रह्म) वेद, ईश्‍वराचे ज्ञान वा ध्यान अथवा वेद ईश्‍वराचा ज्ञाता विद्वान (मला प्राप्त व्हावा) तसेच (क्षत्रम्) राज्य, धनुर्वेद आणि क्षत्रिय (च) देखील (उभे) दोघे (म्हणजे ब्रह्मज्ञानी विद्वान आणि धनुर्धर क्षत्रिय) (श्रियम्) राज्याच्या लक्ष्मी म्हणजे ऐश्‍वर्य वृद्धीसाठी (अश्‍नुताम्) प्राप्त व्हावेत. ज्याप्रमाणे विद्वज्जन (मयि) माझ्यासाठी (मी राष्ट्र कल्याणचिन्तक) (मयि) माझ्यासाठी (उत्तमाम्) अतिश्रेष्ठ (श्रियम्) सौंदर्य व लक्ष्मी (दधतु) धारण करोत, तद्वत हे जिज्ञासु मनुष्या, (ते) तुझ्यासाठीदेखील (तस्यै) ती श्री संपदा मिळण्यासाठी आम्ही (सर्व सामाजिकजन) यत्न करू. ॥16॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोमा अलंकार आहे. जो माणूस परमेश्‍वराच्या आज्ञेचे पालन करतो आणि विद्वानांची सेवा-सत्कार करतो तसेच सर्व लोकांमधून (गुणधर्म स्वभावानुसार माणसें निवडून) त्यांना ब्राह्मण, क्षत्रिय या वर्णीची सुंदर शिक्षण देतो आणि सर्वांच्या उन्नतीचे विधान-प्रबंध करीत आपल्या प्रमाणे सर्वांशी वागतो (सर्वांनी आपल्याशी जसे वागण्याची इच्छा करतो तद्वत इतरांशी वागतो) तो सर्वांसाठी पूजनीय होतो. ॥16॥
Subject
पुन्हा त्याच विषयी -
Footnote
या अध्यायात परमेश्‍वर, विद्वान, बुद्धिप्राप्ती, धनप्राप्ती उपाय या विषयांचे वर्णन आहे. त्यामुळे या अध्यायाच्या अर्थाशी मागील (३१) व्या अध्यायाचा अर्थाचा संबंध आहे वा संगती आहे. हे जाणावे.॥^यजुर्वेद हिन्दी भाष्याच्या मराठी भाष्यानुवादाचा ३२ वा अध्याय समाप्त