Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 32 / Mantra 15

16 Mantra
32/15
Devata- परमेश्वरविद्वांसौ देवते Rishi- मेधाकाम ऋषिः Chhand- निचृद् बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
मे॒धां मे॒ वरु॑णो ददातु मे॒धाम॒ग्निः प्र॒जाप॑तिः। मे॒धामिन्द्र॑श्च वा॒युश्च॑ मे॒धां धा॒ता द॑दातु मे॒ स्वाहा॑॥१५॥

मे॒धाम्। मे॒। वरु॑णः। द॒दा॒तु॒। मे॒धाम्। अ॒ग्निः। प्र॒जाप॑ति॒रिति॑ प्र॒जाऽप॑तिः ॥ मे॒धाम्। इन्द्रः॑। च॒। वा॒युः। च॒। मे॒धाम्। धा॒ता। द॒दा॒तु॒। मे॒। स्वाहा॑ ॥१५ ॥

Mantra without Swara
मेधाम्मे वरुणो ददातु मेधामग्निः प्रजापतिः । मेधामिन्द्रस्च वायुश्च मेधान्धाता ददातु मे स्वाहा ॥

मेधाम्। मे। वरुणः। ददातु। मेधाम्। अग्निः। प्रजापतिरिति प्रजाऽपतिः॥ मेधाम्। इन्द्रः। च। वायुः। च। मेधाम्। धाता। ददातु। मे। स्वाहा॥१५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (वरूणः) अतिश्रेष्ठ परमेश्‍वराने अथवा विद्वानांने (स्वाहा) धर्म वा नीतिमय मार्गाने (मे) मला (मेधाम्) शुद्ध बुद्धी वा विचार आणि धन (ददातु) द्यावे. (अग्निः) विद्येमुळे मला बुद्धि वा सद्विचार द्यावेत, आणि (इन्द्रः) परम ऐश्‍वर्यवान परमेश्‍वराने मला (मेधाम्) बुद्धी द्यावी (च) आणि (वायुः) बलदाता परमेश्‍वराने मला (मेधाम्) बुद्धी द्यावी (च) आणि (धाता) सर्व संसाराचा जो राजा त्या ईश्‍वराने वा राज्याला धारण करणार्‍या विद्वान राजाने (मे) मला ज्याप्रमाणे बुद्धी आणि धन (ददातु) द्यावे, त्याप्रमाणे, लोकही, तुम्ही सर्वसामान्य जनांनाही बुद्धी व धन द्यावे ॥15॥
Essence
भावार्थ - माणसाने जसे आपल्याकरिता उत्तम गुण, कर्म कामना करावी, ज्याप्रमाणे मनुष्याने स्वतःच्या उन्नती-प्रगतीची कामना करावी, तशी परमेश्‍वराजवळ आणि विद्वानांजवळ इतरांकरिताही केली पाहिजे. तशी केवळ प्रार्थनाच करू नये, तर त्यासाठी यत्न व आचरण ही केले पाहिजे. ज्या ज्या वेळी माणूस विद्वानांजवळ जाईल, त्या त्या वेळी त्याने सर्वांच्या कल्याणाकरिता प्रश्‍न विचारावेत आणि त्यांची उत्तरें विद्वानांकडून जाणून घ्यावीत ॥15॥
Subject
पुनश्‍च तोच विषय -