Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 32 / Mantra 1

16 Mantra
32/1
Devata- परमात्मा देवता Rishi- स्वयम्भु ब्रह्म ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
तदे॒वाग्निस्तदा॑दि॒त्यस्तद्वा॒युस्तदु॑ च॒न्द्रमाः॑।तदे॒व शु॒क्रं तद् ब्रह्म॒ ताऽआपः॒ स प्र॒जाप॑तिः॥१॥

तत्। ए॒व। अ॒ग्निः। तत्। आ॒दि॒त्यः। तत्। वा॒युः। तत्। ऊँ॒ इत्यूँ॑। च॒न्द्रमाः॑ ॥ तत्। ए॒व। शु॒क्रम्। तत्। ब्रह्म॑। ताः। आपः॑। सः। प्र॒जाप॑ति॒रिति॑ प्र॒जाऽप॑तिः ॥१ ॥

Mantra without Swara
तदेवाग्निस्तदादित्यस्तद्वायुस्तदु चन्द्रमाः । तदेव शुक्रन्तद्ब्रह्म ताऽआपः स प्रजापतिः ॥

तत्। एव। अग्निः। तत्। आदित्यः। तत्। वायुः। तत्। ऊँ इत्यूँ। चन्द्रमाः॥ तत्। एव। शुक्रम्। तत्। ब्रह्म। ताः। आपः। सः। प्रजापतिरिति प्रजाऽपतिः॥१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (तत्) तो सर्वज्ञ, सर्वव्यापी, सनातन, अनादि, सच्चिदानंदस्वरूप, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्तस्वभाव, न्यायकारी, दयाळू, जगस्रष्टा, धारणकर्ता आणि सर्वांच्या अंतर्यामी असलेला परमेश्‍वर (एवि)(अग्निः) ज्ञानस्वरूप आणि स्वयंप्रकाशित असल्यामुळे (अग्नि) आहे (त्याचे नाव वा विशेषण अग्नी आहे) (ठव्) तोच (आदित्यः) प्रलयकाळी सर्वांचा ग्रहण करणारा असल्यामुळे ‘आदित्य’ आणि (तत्) तोच (वायुः) अनंत बलवान आणि धारणकर्ता असल्यामुळे ‘वायु’ आहे. (तत्) तोच (चन्द्रमाः) आनंदस्वरूप व आनंददायक असल्यामुळे ‘चन्द्रमा’ आणि (तत् एव) तोच (शुक्रम्) शीघ्रकारी व शुद्ध असल्यामुळे ‘शुक्र’ आहे. (तत्) तोच (ब्रह्म) महान असल्यामुळे ‘आप’ आहे. (उ) आणि (सः) तो (प्रजापतिः) सर्व प्रजेचा स्वामी असल्यामुळे ‘प्रजापति’ आहे. तुम्ही त्या एक ईश्‍वराची अनेक गुणवाचक नांवें वा स्वरूप समजून घ्या. ॥1॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, जसे ईश्‍वराची अग्नी आदी गौण नांवें आहेत, तशीच त्याची इन्द्र आदी अन्यही नांवें आहेत. त्याचीच उपासना फलदायिनी आहे, हे नीट जाणून घ्या. ॥1॥
Subject
परमेश्‍वर कसा आहे, याविषयी या ३२ व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रात सांगितलेले आहे -