Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 31 / Mantra 5

22 Mantra
31/5
Devata- स्त्रष्टा देवता Rishi- नारायण ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
ततो॑ वि॒राड॑जायत वि॒राजो॒ऽअधि॒ पूरु॑षः।स जा॒तोऽअत्य॑रिच्यत प॒श्चाद् भूमि॒मथो॑ पु॒रः॥५॥

ततः॑। वि॒राडिति॑ वि॒ऽराट्। अ॒जा॒य॒त॒। वि॒राज॒ इति॑ वि॒ऽराजः॑। अधि॑। पूरु॑षः। पुरु॑ष॒ऽइति॑ पुरु॑षः ॥ सः। जा॒तः। अति॑। अ॒रि॒च्य॒त॒। प॒श्चात्। भूमि॑म्। अथो॒ऽइत्यथो॑। पु॒रः ॥५ ॥

Mantra without Swara
ततोविराडजायत विराजोऽअधि पूरुषः । स जातोऽअत्यरिच्यत पश्चाद्भूमिमथो पुरः ॥

ततः। विराडिति विऽराट्। अजायत। विराज इति विऽराजः। अधि। पूरुषः। पुरुषऽइति पुरुषः॥ सः। जातः। अति। अरिच्यत। पश्चात्। भूमिम्। अथोऽइत्यथो। पुरः॥५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (ततः) त्या सनातन पूर्ण परमात्म्यापासून (विराट्) विविध प्रकारच्या पदार्थांनी सुशोभित हे विराट ब्रह्माण्डरूप संसार (अजायत) उत्पन्न झाले आहे. या (विराजः) विराट संसाराच्या (अधि) वर अधिष्ठाता तो (पुरूषः) परिपूर्ण परमात्माच आहे (व होता) (अथो) यानंतर (सः) तो परमपुरूष (पुरः) आरंभापासून (जातः) (अधिष्ठाता व स्वामी म्हणून) प्रसिद्ध होता (व आहे) या शिवाय तो (अति, अरिच्यात) जगापासून वेगळा असून तोच (पश्‍चात्) मागें यानंतर (भूमिम्) पृथ्वीला उत्पन्न करतो. (परमेश्‍वराच्या या स्वरूपाला तुम्ही नीट समजून घ्या.) ॥5॥
Essence
भावार्थ - परमेश्‍वरापासून या सर्व समष्टि रूप जगाची उत्पत्ती होते. तो या उत्पन्न जगापासून पृथक असूनही त्यामधे व्याप्त आहे, तसे असूनही तो जगाच्या दोषांनी लिप्त होत नाही. तोच जगाचा अधिष्ठाता वा नियामक आहे. याप्रकारे सामान्यजगाची रचना करून भुमी आदीच्या रचनेविषयी क्रमाने पुढील मंत्रात सांगितले जात आहे. ॥5॥
Subject
पुन्हा तोच विषय -