Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 31 / Mantra 3

22 Mantra
31/3
Devata- पुरुषो देवता Rishi- नारायण ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
ए॒तावा॑नस्य महि॒मातो॒ ज्यायाँ॑श्च॒ पूरु॑षः।पादो॑ऽस्य॒ विश्वा॑ भू॒तानि॑ त्रि॒पाद॑स्या॒मृतं॑ दि॒वि॥३॥

ए॒तावा॑न्। अ॒स्य॒। म॒हि॒मा। अतः॑। ज्याया॑न्। च॒। पूरु॑षः। पुरु॑ष॒ऽइति॒ पुरु॑षः ॥ पादः॑। अ॒स्य॒। विश्वा॑। भू॒ता॑नि॑। त्रि॒पादिति॑। त्रि॒ऽपात्। अ॒स्य॒। अ॒मृत॑म्। दि॒वि ॥३ ॥

Mantra without Swara
एतावानस्य महिमातो ज्यायाँश्च पूरुषः । पादोस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतन्दिवि ॥

एतावान्। अस्य। महिमा। अतः। ज्यायान्। च। पूरुषः। पुरुषऽइति पुरुषः॥ पादः। अस्य। विश्वा। भूतानि। त्रिपादिति। त्रिऽपात्। अस्य। अमृतम्। दिवि॥३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यहो, (अस्य) या जगदीश्‍वराच्या (महिमा) महत्त्वाचा परिचायक (एतावान्) हे दृश्य आणि अदृश्य अखिल ब्रह्मांड आहे. (अतः) तो (पूरूषः) परिपूर्ण परमात्मा (अतः) या ब्रह्मांडाहून (ज्यायान्) अतिप्रशंसनीय व महान आहे. (विश्‍वा) सर्व (भूतानि) पृथ्वी आदी चराचर जगत (अस्य) या ईश्‍वराचा एक (पादः) अंशमात्र आहे आदि (अस्य) या सृष्टिरचेत्याचा (त्रिपाद) तीन अंश (अमृतम्) नाशरहित महिमा (दिवी) द्योतनात्मक स्वरूपात आहे (तो अविनाशी) अमर असून सृष्टी विनाशी आहे. ती त्या परम पुरूषाच्या पूर्णांशामधे तीन अंशदेखील (3%) होत नाही.) ॥3॥
Essence
भावार्थ - सूर्य, चन्द्र आदी हे सर्व जे चर-अचर वा लोक-लोकान्तर जगत आहे, ते आणि ही सर्व चित्र-विचित्र अद्भुत रचना परमेश्‍वराचे महत्त्व दाखवितो. (ही अद्भुत रचना पाहून त्याच्या महिमेचा किंचितसा अनुमान करता येतो.) उत्पत्ति, स्थिती, प्रलय या तीनही स्थितीत ही सृष्टी घटते, वाढते, तरीही ती परमेश्‍वराच्या एक चतुर्थांशात राहते. ती परमेश्‍वराच्या चवथ्या भागाच्या सीमेपर्यंतही जात नाही. ईश्‍वराच्या सामर्थ्याचे तीन अंश आपल्या अविनाशी मोक्षस्वरूपातही सदा शेष असतात,. या कथनामुळे ईश्‍वराच्या अनंततत्वात काही न्यून होत नाही, मात्र या कथनामुळे जगापेक्षा ईश्‍वराने महत्त्व आणि जगाच्या न्यूनत्वाचा मात्र बोध अवश्य होतो ॥3॥
Subject
पुनश्‍च, तोच विषय -