Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 31 / Mantra 22

22 Mantra
31/22
Devata- आदित्यो देवता Rishi- उत्तरनारायण ऋषिः Chhand- निचृदार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
श्रीश्च॑ ते ल॒क्ष्मीश्च॒ पत्न्या॑वहोरा॒त्रे पा॒र्श्वे नक्ष॑त्राणि रू॒पम॒श्विनौ॒ व्यात्त॑म्।इ॒ष्णन्नि॑षाणा॒मुं म॑ऽइषाण सर्वलो॒कं म॑ऽइषाण॥२२॥

श्रीः। च॒। ते॒। ल॒क्ष्मीः। च॒। पत्न्यौ॑। अ॒हो॒रा॒त्रेऽइत्य॑होरात्रे। पार्श्वेऽइति॑ पा॒र्श्वे। नक्ष॑त्राणि। रू॒पम्। अ॒श्विनौ॑। व्यात्त॒मिति॑ वि॒ऽआत्त॑म्। इष्णन् ॥ इषा॒ण॒। अ॒मुम्। मे॒। इ॒षा॒ण॒। स॒र्वलो॒कमिति॑ सर्वऽलो॒कम्। मे॒। इ॒षा॒ण॒ ॥२२ ॥

Mantra without Swara
श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यावहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनौ व्यात्ताम् । इष्णन्निषाणामुम्मऽइषाण सर्वलोकम्म इषाण ॥

श्रीः। च। ते। लक्ष्मीः। च। पत्न्यौ। अहोरात्रेऽइत्यहोरात्रे। पार्श्वेऽइति पार्श्वे। नक्षत्राणि। रूपम्। अश्विनौ। व्यात्तमिति विऽआत्तम्। इष्णन्॥ इषाण। अमुम्। मे। इषाण। सर्वलोकमिति सर्वऽलोकम्। मे। इषाण॥२२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे जगदीश्‍वर, (ते) आपली (श्रीः) समग्रशोभा (च) आणि (लक्ष्मीः) सर्व ऐश्‍वर्य (च) देखील (पत्न्यौ) दोन पत्नीप्रमाणे असलेले (अहोरात्रे) रात्र आणि दिवस (या रूपात प्रकट वा प्रत्यक्ष दिसत आहेत) (पार्श्‍वे) आपल्या सृष्टीच्या मागे-पुढे (सृष्टीरचनेच्या आधी व नंतर) आपणच (अश्‍विनौ) सूर्य आणि चंद्राच्या रूपाने (व्यात्ताम्) फैलावलेल्या मुखात जसे सर्व दिसते, तसे सूर्य-चंद्र आणि (नक्षत्राणि) नक्षत्र याच्या (रूपम्) रूपाने आपणच दिसता. असे महान आपण (मे) माझ्यासाठी (अमुम्) त्या परोक्ष सुखाची (इच्छन्) इच्छा करताना (इषाणा) तशी इच्छापूर्ती करा आणि (मे) माझ्यासाठी (सर्व लोकम्) सर्व सृष्टीत रममाण असे आपणांसच मी पाहीन अशी (इषाण) कामनापूर्ती करा. ॥22॥
Essence
भावार्थ - हे राजा आणि मनुष्यांनो, जसे ईश्‍वराचे न्याय आदी गुण, व्याप्ती, कृपा, पुरूषार्थ, सत्य, रचना आणि सत्य नियम आहेत, तसेच तुम्हा लोकांचेही असावेत त्यामुळे तुमचे सुख उत्तरोत्तर वाढेल. ॥22॥
Subject
ईश्‍वर कसा आहे, याविषयी -
Footnote
या अध्यायात ईश्‍वराच्या गुण आणि सृष्टीविषयी तसेच राजाच्या गुणांचे वर्णन असल्यामुळे या अध्यायाच्या अर्थाची संगती पूर्वीच्या ३० व्या अध्यायाच्या अर्थाशी आहे, असे जाणावे ॥^यजुर्वेद हिन्दी भाष्याचा मराठी भाष्यानुवादाचा ३१ वा अध्याय समाप्त