Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 31 / Mantra 2

22 Mantra
31/2
Devata- ईशानो देवता Rishi- नारायण ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
पुरु॑षऽए॒वेदꣳ सर्वं॒ यद्भू॒तं यच्च॑ भाव्यम्।उ॒तामृ॑त॒त्वस्येशा॑नो॒ यदन्ने॑नाति॒रोह॑ति॥२॥

पुरु॑षः। ए॒व। इ॒दम। सर्व॑म्। यत्। भू॒तम्। यत्। च॒। भा॒व्य᳖म् ॥ उ॒त। अ॒मृ॒तत्वस्येत्य॑मृत॒ऽत्वस्य॑। ईशा॑नः। यत्। अन्ने॑न। अ॒ति॒रोहतीत्य॑ति॒ऽरोह॑ति ॥२ ॥

Mantra without Swara
पुरुष एवेदँ सर्वँयद्भूतञ्यच्च भाव्यम् । उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति ॥

पुरुषः। एव। इदम। सर्वम्। यत्। भूतम्। यत्। च। भाव्यम्॥ उत। अमृतत्वस्येत्यमृतऽत्वस्य। ईशानः। यत्। अन्नेन। अतिरोहतीत्यतिऽरोहति॥२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (हे जाणून घ्या की) (यत्) जे काही (भाव्यम्) पुढे उत्न्न होणार आहे (उत) या शिवाय (यत्) जे जे (म्हणजे सर्व) (अन्नेन) पृथ्वी आदी पदार्थांच्या संबंधाने (अतिरोहति) घडत आहे (सृष्टीत जे उत्पन्न आणि विद्यमान पदार्थ आहेत आणि) वाढत आहेत (इदम्) अशा त्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रूप (सर्वम्) समस्त सृष्टीचा (स्वयिता) (अमृतसकय) आणि अविनाशी मोक्षसुखाचा अथवा कारणाचा (ईशानः) अधिष्ठाता (पुरूषः) सत्य गुण, कर्म स्वभावाने परिपूर्ण केवळ परमात्मा (एव) च एकमेव आहे (अन्य कोणी नाही) ॥2॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, जाणून घ्या की ज्या ईश्‍वराने जेव्हां जेव्हां सृष्टी रचना झाली, तेंव्हा तेंव्हा ईश्‍वरानेच तिची रचना केली असून तोच यावेळी सृष्टीचा धारणकर्ता आहे तोच या वृष्टीचा विनाश करून पुन्हा तिची निर्मिती उत्पत्ती करील. ज्याच्या आधाराने सर्व पदार्थादी विद्यमान आहेत आणि सर्व वाढत आहे, त्या सर्वांचा स्वामी असलेल्या, परमात्म्याची उपासना करा. त्याहून भिन्न कोणाचीही उपासना करू नका ॥2॥
Subject
पुन्हा, तोच विषय (ईश्‍वरोपासना) -