Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 31 / Mantra 11

22 Mantra
31/11
Devata- पुरुषो देवता Rishi- नारायण ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
ब्रा॒ह्म॒णोऽस्य॒ मुख॑मासीद् बा॒हू रा॑ज॒न्यः कृ॒तः।ऊ॒रू तद॑स्य॒ यद्वैश्यः॑ प॒द्भ्या शू॒द्रोऽअ॑जायत॥११॥

ब्रा॒ह्म॒णः᳖। अ॒स्य॒। मुख॑म्। आ॒सी॒त्। बा॒हूऽइति॑ बा॒हू। रा॒ज॒न्यः᳖। कृ॒तः ॥ ऊ॒रूऽइत्यू॒रू। तत्। अ॒स्य॒। यत्। वैश्यः॑। प॒द्भ्यामिति॑ प॒त्ऽभ्याम्। शू॒द्रः। अ॒जा॒य॒त॒ ॥११ ॥

Mantra without Swara
ब्राह्मणोस्य मुखमासीद्बाहू राजन्यः कृतः । ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्याँ शूद्रोऽअजायत ॥

ब्राह्मणः। अस्य। मुखम्। आसीत्। बाहूऽइति बाहू। राजन्यः। कृतः॥ ऊरूऽइत्यूरू। तत्। अस्य। यत्। वैश्यः। पद्भ्यामिति पत्ऽभ्याम्। शूद्रः।अजायत॥११॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे जिज्ञासू जनहो (पूर्वीच्या मंत्रात ज्यानी प्रश्‍न विचारले, त्या जिज्ञासूंना उत्तर देत विद्वान म्हणतात) (अस्य) या ईश्‍वराच्या सृष्टीत (ब्राह्मण, वेद आणि ईश्‍वर यांचा ज्ञाता, सेवक आणि उपासक जो आहे, त्याला (मुखम्) मुखाप्रमाणे उत्तम ब्राह्मण (आसीत्) आहे, असे जाणा. (बाहू) शरीरात जसे दोन भुजा तसे बल-पराक्रम करणार्‍याला (राजन्यः) राजपूत म्हणजे क्षत्रिय (कृतः) केला आहे. असे जाणा (यत्) जो (ऊरू) जंघाप्रमाणे वेगाने काम करणारा आहे, (वत्) तो मनुष्य (अस्य) या परमपुरूषाच्या सृष्टीत (वैश्यः) सर्वत्र प्रवेश वा संचार करणारा (व्यापार -उदीमासाठी दूर-दूरच्या देशात प्रवास करणारा) आहे, त्याला वैश्य जाणा आणि (पद्भ्याम्) सेवा आणि निरभियानिता ज्याच्या अंगी आहेत अशा मनुष्याला (शूद्र) मूर्खत्वादी गुणांनी युक्त मनुष्याला शूद्र (अजायत) (पायाप्रमाणे कष्ट व श्रम करण्याच्या स्वभावाचा माणूस) परमेश्‍वराच्या सृष्टीत शूद्र जाणावा. ही पूर्वीच्या मंत्रातील प्रश्‍नांची उत्तरें झाली ॥11॥
Essence
भावार्थ - शरीरात जसे मुख उत्तम, तसा जो विद्या, शम, दम आदी गुणांमुळे उत्तम मनुष्य असेल, तो ब्राह्मण, जो बाहूप्रमाणे अधिक बल, पराक्रमशील आणि कार्यसिद्धी करणारा तो क्षत्रिय, जो व्यवहारविद्या (कृषी, व्यापार आदीत) प्रवीण आहे, त्याला वैश्य आणि जो सेवाकुशल, पायाप्रमाणे विद्याविहीन तसेच मूर्खत्वादी निम्न गुणांनी युक्त लोक आहेत, त्याना शूद्र करावे आणि शूद्र मानावे ॥11॥
Subject
पुन्हा त्याच विषय -