Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 31 / Mantra 1

22 Mantra
31/1
Devata- पुरुषो देवता Rishi- नारायण ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
स॒हस्र॑शीर्षा॒ पुरु॑षः सहस्रा॒क्षः स॒हस्र॑पात्।स भूमि॑ꣳ स॒र्वत॑ स्पृ॒त्वाऽत्य॑तिष्ठद्दशाङ्गु॒लम्॥१॥

सहस्र॑शी॒र्षेति॑ स॒हस्र॑ऽशीर्षा। पुरु॑षः। स॒ह॒स्रा॒क्ष इति॑ सहस्रऽअ॒क्षः। सहस्र॑पा॒दिति॑ स॒हस्र॑ऽपात् ॥ सः। भूमि॑म्। स॒र्वतः॑ स्पृ॒त्वा। अति॑। अ॒ति॒ष्ठ॒त्। द॒शा॒ङ्गु॒लमिति॑ दशऽअङ्गु॒लम् ॥१ ॥

Mantra without Swara
सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् । स भूमिँ सर्वत स्पृत्वात्यतिष्ठद्दशाङ्गुलम्॥

सहस्रशीर्षेति सहस्रऽशीर्षा। पुरुषः। सहस्राक्ष इति सहस्रऽअक्षः। सहस्रपादिति सहस्रऽपात्॥ सः। भूमिम्। सर्वतः स्पृत्वा। अति। अतिष्ठत्। दशाङ्गुलमिति दशऽअङ्गुलम्॥१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (सहस्रशीर्षा) सर्व प्राण्यांचे हजारो शिर (लाक्षणिक अर्थाने असंख्य शिर म्हणजे अगणित जीव) तसेच (सहस्राक्षः) हजारो वा असंख्यात नेत्र आणि (सहस्रपात्) असंख्य पाय ज्यामधे अंतर्भूत आहेत, असा तो (पुरूषः) सर्वत्र व्यापक, परिपूर्ण परमेश्‍वर आहे. (सः) (सर्वतः) सर्व दिशांना तसेच (भूमिम्) पृथ्वीला (संकेतितार्थ-सर्व ग्रह-नक्षत्र, ब्रह्मांड यांना) (स्पृत्वा) सर्वतः) व्याप्त करून (दशाङ्गुलम् पांच स्थूल भूत आणि पाच सूक्ष्म भूत हे ज्या परम पुरूषाचे अवयव आहेत, त्या संपूर्ण जगाला (अति, अतिष्ठत्) उल्लंघून व्याप्त आहे (तो परमेश्‍वर तुमच्यासाठी उपासनीय आहे) तोच सर्वाहून पृथक आहे व ?? तो सर्व जग, चेतन-जड सर्व पदार्थांत व्यापक आहे) ॥1॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, आम्ही मनुष्य आदी प्राण्यांचे अगणित शिर, नेत्र आणि पाय आदी सर्व अंग-प्रत्यंग ज्या पूर्ण परमेश्‍वरात अंतर्गत आहेत, जो परमात्मा भूमी आदी पासून उत्पन्न पाच सूक्ष्म भूतांनी संयुक्त जगाला पूर्ण होऊन, जेथे जग नाही, तेथेही जो पूर्ण वा व्याप्त आहे, त्या समस्त जगदुत्पादक, परिपूर्ण, सच्चिद्दानन्दस्वरूप, नित्य, शुद्ध, बुद्ध मुक्त स्वभाव परमेश्‍वराला सोडून तुम्ही अन्य कोणाची उपासना कदापी करू नका. याहून अधिक असे की तुम्ही त्याच ईश्‍वराची उपासना करून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, यांना प्राप्त करा. ॥1॥
Subject
आता एकतिसाव्या अध्यायाचा आरंभ होत आहे. या अध्यायाच्या प्रथम मंत्रात परमेश्‍वराची उपासना, स्तुती आणि सृष्टिविविद्या हे विषय वर्णिले आहेत.