Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 30 / Mantra 8

22 Mantra
30/8
Devata- विद्वांसो देवता Rishi- नारायण ऋषिः Chhand- कृतिः Swara- निषादः
Mantra with Swara
न॒दीभ्यः॑ पौञ्जि॒ष्ठमृ॒क्षीका॑भ्यो॒ नैषा॑दं पुरुषव्या॒घ्राय॑ दु॒र्मदं॑ गन्धर्वाप्स॒रोभ्यो॒ व्रात्यं॑ प्र॒युग्भ्य॒ऽ उन्म॑त्तꣳ सर्पदेवज॒नेभ्योऽप्र॑तिपद॒मये॑भ्यः कित॒वमी॒र्यता॑या॒ऽअकि॑तवं पिशा॒चेभ्यो॑ विदलका॒रीं या॑तु॒धाने॑भ्यः कण्टकीका॒रीम्॥८॥

न॒दीभ्यः॑। पौ॒ञ्जि॒ष्ठम्। ऋ॒क्षीका॑भ्यः। नैषा॑दम्। नैसा॑द॒मिति॒ नैऽसा॑दम्। पु॒रु॒ष॒व्या॒घ्रायेति॑ पुरुषऽव्या॒घ्राय॑। दु॒र्मद॒मिति॑ दुः॒ऽमद॑म्। ग॒न्ध॒र्वा॒प्स॒रोभ्य॒ इति॒ गन्धर्वाप्स॒रःऽसरःऽभ्यः॑। व्रात्य॑म्। प्र॒युग्भ्य॒ इति॑ प्र॒युक्ऽभ्यः॑। उन्म॑त्त॒मित्युत्ऽम॑त्तम्। स॒र्प॒दे॒व॒ज॒नेभ्य॒ इति॑ सर्पऽदेवज॒नेभ्यः॑। अप्र॑तिपद॒मित्यप्र॑तिऽपदम्। अये॑भ्यः। कि॒त॒वम्। ई॒र्य्यता॑यै। अकि॑तवम्। पि॒शा॒चेभ्यः॑। वि॒द॒ल॒का॒रीमिति॑ विदलऽका॒रीम्। या॒तु॒धाने॑भ्य॒ इति॑ यातु॒ऽधाने॑भ्यः। क॒ण्ट॒की॒का॒रीमिति॑ कण्टकीऽका॒रीम् ॥८ ॥

Mantra without Swara
नदीभ्यः पौञ्जिष्ठमृक्षीकाभ्यो नैषादम्पुरुषव्याघ्राय दुर्मदङ्गन्धर्वाप्सरोभ्यो व्रात्यम्प्रयुग्भ्य उन्मत्तँ सर्पदेवजनेभ्यो प्रतिपदमयेभ्यः कितवमीर्यतायाऽअकितवम्पिशाचेभ्यो बिदलकारीँयातुधानेभ्यः कण्टकीकारीम् ॥

नदीभ्यः। पौञ्जिष्ठम्। ऋक्षीकाभ्यः। नैषादम्। नैसादमिति नैऽसादम्। पुरुषव्याघ्रायेति पुरुषऽव्याघ्राय। दुर्मदमिति दुःऽमदम्। गन्धर्वाप्सरोभ्य इति गन्धर्वाप्सरःऽसरःऽभ्यः। व्रात्यम्। प्रयुग्भ्य इति प्रयुक्ऽभ्यः। उन्मत्तमित्युत्ऽमत्तम्। सर्पदेवजनेभ्य इति सर्पऽदेवजनेभ्यः। अप्रतिपदमित्यप्रतिऽपदम्। अयेभ्यः। कितवम्। ईर्य्यतायै। अकितवम्। पिशाचेभ्यः। विदलकारीमिति विदलऽकारीम्। यातुधानेभ्य इति यातुऽधानेभ्यः। कण्टकीकारीमिति कण्टकीऽकारीम्॥८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे जगदीश्‍वर अथवा हे राजन्, आपण (नदीभ्यः) नद्यांना विकृत वा दूषित करणार्‍या (पौञ्जिष्ठम्) धानुकाला (धनुर्धर वा पिंजारी याला) (दूर करा), त्या कार्यापासून परावृत्त करा.) (ऋक्षीकाभ्यः) (मार्गाने जाणार्‍या-येणार्‍या) स्त्रियांकडे विकृत भावनेने पाहणार्‍या (नैषादम्) निषाद (कोळी वा नावाडी) च्या पुत्राला आणि (पुरुषव्याघ्राय) व्याघ्राप्रमाणे हिंसक पुरूषाचा जो मित्र त्या (दुर्मदम्) दुष्ट अहंकारी माणसाला (कुठेतरी लांब हाकलून द्या) (गन्धर्वाप्सरोभ्यः) गाणार्‍या-नाचणार्‍या स्त्रियांकडे रममाण होणार्‍या (व्रात्यम्) संस्कारशून्य माणसाला, तसेच (प्रयुग्भ्यः) प्रयोग वा प्रयत्न करणार्‍या मनुष्याकडे (उन्मतम्) उन्मादावृत्तीने पाहणाऱ्या (त्याचे प्रयत्न अयशस्वी होती, असे कर्म करणार्‍याला) (कुठे तरी दूर पाठवा) (सर्पदेवजनेभ्यः) सर्प तसेच मूर्खांचे हित करणार्‍या (अप्रतिपदम्) संशयात्मा मनुष्याला आणि (अयेभ्यः) जे पदार्थ (श्रम व यत्न करून) प्राप्त केले पाहिजेत, त्यांकडे (कितवम्) जुगारी माणसाच्या वृत्तीने वागणार्‍या (म्हणजे धूर्तपणे वा श्रम न करता प्राप्त करणार्‍या) माणसाला (दूर हाकलून द्या) (ईर्ष्यतायै) घाबरून थरथरत असलेल्या मनुष्याला (अकितवम्) जुगार खेळण्याकडे प्रवृत्त करणार्‍या तसेच (पिशाचेभ्यः) दुराचारामुळे ज्यांची सत्ववृत्ती नष्ट झाली आहे, अथवा रक्तासह कच्चे मांस खाणार्‍या माणसाला (दूर हाकला) (विदलकारीम्) (मांसाचे वा जीवंत माणसाला मारून) त्याचे तुकडे-तुकडे करणाया स्त्रीला आणि (यातुधानेभ्यः) रस्त्यावर प्रवाशांना लुटून, लुबाडून धन एकत्रित करणार्‍या लुटारूंना मदत करणार्‍या स्त्रीला तसेच (कण्टकीकारीम्) मार्गात काटे पेरणार्‍या स्त्रीला (आमच्या राज्यातून दूर कुठेतरी हाकलून द्या, अशी आम्हा नागरिकांची परमेश्‍वराला व राजाला प्रार्थना आहे.) ॥8॥
Essence
भावार्थ - हे राजन्, ज्याप्रमाणे परमेश्‍वर महात्माजनांना दुर्जनांपासून दूर ठेवतो अथवा जसे दुर्जन परमेश्‍वरापासून (त्याच्या भक्ती, उपासनादीपासून) दूर असतात, तसे आपण दुष्टांपासून दूर रहा अथवा दुष्टांना आपल्यापासून दूर ठेवा (दुष्ट आणि स्वार्था मंत्री, अधिकारी यांना जवळ ठेवू नका) अथवा दुष्टांना सुशिक्षित करून सन्मार्गावर आणा ॥8॥
Subject
पुन्हा, त्याचविषयी -