Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 30 / Mantra 6

22 Mantra
30/6
Devata- परमेश्वरो देवता Rishi- नारायण ऋषिः Chhand- निचृदष्टिः Swara- मध्यमः
Mantra with Swara
नृ॒त्ताय॑ सू॒तं गी॒ताय॑ शैलू॒षं धर्मा॑य सभाच॒रं न॒रिष्ठा॑यै भीम॒लं न॒र्माय॑ रे॒भꣳ हसा॑य॒ कारि॑मान॒न्दाय॑ स्त्रीष॒खं प्र॒मदे॑ कुमारीपु॒त्रं मे॒धायै॑ रथका॒रं धैर्य्या॑य॒ तक्षा॑णम्॥६॥

नृ॒त्ताय॑। सू॒त॒म्। गी॒ताय॑। शै॒लू॒षम्। धर्मा॑य। स॒भा॒च॒रमिति॑ सभाऽच॒रम्। न॒रिष्ठा॑यै। भी॒म॒लम्। न॒र्माय॑। रे॒भम्। हसा॑य। कारि॑म्। आ॒न॒न्दायेत्या॑न॒न्दाय॑। स्त्री॒ष॒ख॒म्। स्त्री॒स॒खमिति॑ स्त्रीऽस॒खम्। प्र॒मद॒ इति॑ प्र॒ऽमदे॑। कु॒मा॒री॑पु॒त्रमिति॑ कुमारीऽपु॒त्रम्। मे॒धायै॑। र॒थ॒का॒रमिति॑ रथऽका॒रम्। धैर्य्या॑य। तक्षा॑णम् ॥६ ॥

Mantra without Swara
नृत्ताय सूतङ्गीताय शैलूषन्धर्माय सभाचरन्नरिष्ठायै भीमलन्नर्माय रेभँ हसाय कारिमानन्दाय स्त्रीषुखम्प्रमदे कुमारीपुत्रम्मेधायै रथकारन्धैर्याय तक्षाणम् ॥

नृत्ताय। सूतम्। गीताय। शैलूषम्। धर्माय। सभाचरमिति सभाऽचरम्। नरिष्ठायै। भीमलम्। नर्माय। रेभम्। हसाय। कारिम्। आनन्दायेत्यानन्दाय। स्त्रीषखम्। स्त्रीसखमिति स्त्रीऽसखम्। प्रमद इति प्रऽमदे। कुमारीपुत्रमिति कुमारीऽपुत्रम्। मेधायै। रथकारमिति रथऽकारम्। धैर्य्याय। तक्षाणम्॥६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे परमेश्‍वर, अथवा हे राजन्, आपण (नृत्ताय) नृत्य, (नाट्यशास्त्र आदी) साठी (सूतम्) क्षत्रिय पुरूषापासून ब्राह्मण स्त्रीच्या पोटी जन्मणारा-तो सूत, त्या सूताला (उत्पन्न करा. राजाच्या संदर्भात-राज्यात नट कलाकार उत्पन्न होतील, अशी नाट्यशाळा आदींची स्थापना करा) (गीताय) गीतरचना एवं संगीतकलेच्या वृद्धीसाठी (शैलूषम्) गानविद्येत प्रवीण नट वा गायक (उत्पन्न करा) (धर्माय) धर्माच्या रक्षणासाठी (सभाचरम्) सुयोग्य सभासद वा सभाधीश (उत्पन्न करा-निर्माण करा) (निर्माण) कोमलता (वा पारस्परिक स्नेहभाववृद्धीसाठी) (स्त्रीसखम्) पत्नीप्रत सख्य भावाने वागणारा पती आणि (मेधायै) बुद्धीसाठी (रथकारम्) विमानादी रथ निर्माण करणारे (तांत्रिकजन उत्पन्न करा-निर्माण करा) (धैर्याय) सावकाशपणे कसे काम करावे, हे शिकविण्यासाठी (तक्षाणम्) बारीक कलाकुसर आणि कलात्मक कार्य करण्यासाठी सुतार सारखे कारागीर (उत्पन्न करा-निर्माण करा) (नरिष्ठायै) अतिदुष्ट मनुष्यांचे संगठन तयार करणार्‍या माणसांसाठी (भीमलम्) भयंकर विषयांकडे आकर्षक असार्‍याला तसेच (हसाय) हसण्याचा स्वभाव असलेल्या अभद्र व अश्‍लील मनुष्यासाठी (कारिम्) उपहासकर्त्याला-चेष्टेखोर मनुष्याला आणि (प्रमदे) प्रमादी स्वभावाच्या माणसासाठी (कुमारीपुत्रम्) विवाह पूर्वी कुमारी मातेच्या पोटी व्यभिचाराद्वारे उत्पन्न पुत्राला-या सर्वांना दूर करा, (समाजापासून दूर ठेवा की ज्यायोगे समाज सदाचारयुक्त राहील.) ॥6॥
Essence
भावार्थ- राजपुरूषांनी परमेश्‍वराच्या आदेशा प्रमाणे आणि राजाच्या आज्ञेप्रमाणे श्रेष्ठ धर्मात्माजनांना प्रोत्साहन द्यावे आणि ज्यांच्यापासून समाजाला भय वा हानी होत असेल, त्याना दूर ठेवले पाहिजे. तसेच राजा आणि राजपचरूषांनी अनेक सभांचे निर्माण करून सर्व शासन-व्यवस्था करावी आणि राज्यात शिल्पविद्यांचा विकास करावा. ॥6॥
Subject
राज्यपुरूषांनी काय करावे, या विषयी -