Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 30 / Mantra 4

22 Mantra
30/4
Devata- सविता देवता Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
वि॒भ॒क्तार॑ꣳ हवामहे॒ वसो॑श्चि॒त्रस्य॒ राध॑सः। स॒वि॒तारं॑ नृ॒चक्ष॑सम्॥४॥

वि॒भ॒क्तार॒मिति॑ विऽभ॒क्तार॑म्। ह॒वा॒म॒हे॒। वसोः॑। चि॒त्रस्य॑। राध॑सः। स॒वि॒तार॑म्। नृ॒चक्ष॑स॒मिति॑ नृ॒ऽचक्ष॑सम् ॥४ ॥

Mantra without Swara
विभक्तारँ हवामहे वसोश्चित्रस्य राधसः । सवितारन्नृचक्षसम् ॥

विभक्तारमिति विऽभक्तारम्। हवामहे। वसोः। चित्रस्य। राधसः। सवितारम्। नृचक्षसमिति नृऽचक्षसम्॥४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (वसोः) जो जीवनात सुखांची स्थापना करणारा आहे (चित्रस्य) आश्‍चर्यरूप असून जो (राधसः) धनाचा (विभक्तारम्) विभाग करणारा (सर्वांना ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे धन संपत्ती देणारा) परमेश्‍वर आहे, त्या (सवितारम्) सर्व जगदुत्पादक (नृचक्षसम्) सर्वांचा अंतर्यामी असलेल्या, सर्वांची कर्में पाहणारा जो परमात्मा आहे, त्याची आम्ही (हवामहे) प्रशंसा करतो, स्तुती करतो. लोकहो, आम्हां उपासकांप्रमाणे तुम्हीदेखील त्याची स्तुती करा ॥4॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. हे राजा, जसा परमेश्‍वर सर्व जीवात्म्यांना ज्याच्या कर्माप्रमाणे फळ देतो, तसे आपणही सर्व प्रजाजनांना यथोचित न्याय द्या. जसा जगदीश्‍वर ज्या त्या जीवाचे पाप अथवा पुण्यकर्म आहे, तेवढेच फळ त्याला देतो, तसे हे राजा, आपणही ज्याचे जसे कर्म वा देय असेल त्याला तसे तेवढेच फळ (पुरस्कार व पदार्थरूपाने) द्या. ज्याप्रमाणे परमेश्‍वर पक्षपात न करता सर्व जीवांशी त्याच्या कर्माप्रमाणे व न्यायाने वागतो, तसे हे राजन्, आपणही व्हा. ॥4॥
Subject
पुन्हा, त्याच विषयी-