Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 30 / Mantra 2

22 Mantra
30/2
Devata- सविता देवता Rishi- नारायण ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
तत्स॑वि॒तुर्वरे॑ण्यं॒ भर्गो॑ दे॒वस्य॑ धीमहि।धियो॒ यो नः॑ प्रचो॒दया॑त्॥२॥

तत्। स॒वि॒तुः। वरे॑ण्यम्। भर्गः॑। दे॒वस्य॑। धी॒म॒हि॒। धियः॑। यः। नः॒। प्र॒चो॒दया॒दिति॑ प्रऽचो॒दया॑त् ॥२ ॥

Mantra without Swara
तत्सवितुर्वरेण्यम्भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयत् ॥

तत्। सवितुः। वरेण्यम्। भर्गः। देवस्य। धीमहि। धियः। यः। नः। प्रचोदयादिति प्रऽचोदयात्॥२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (यः) जो (नः) आमच्या (धियः) बुद्धीला व कर्मांना (प्रचोदयत्) प्रेरणा देतो त्या (सवितुः) सकलजगदुत्पादक, सर्व ऐश्‍वर्य आणि (देवस्य) सुख देणार्‍या परमेश्‍वराच्या (वरेण्यम्) ग्रहण करण्यास अत्युत्तम अशा (भर्गः) ज्यामुळे दुःखांचा विनाश होतो, परमेवराच्या त्या शुद्ध स्वरूपाला ज्याप्रमाणे आम्ही (ज्येष्ठ उपासकगण) (धीमहि) धारण करतो (त्याच्या आनंदस्वरूपाचे ध्यान करतो) (तत्) ईश्‍वराच्या त्या शुद्ध स्वरूपाला तुम्ही (सामान्य उपासकगण) देखील धारण करा ॥2॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जसे परमेश्‍वर जीवांना अशुभ आचरणापासून निवारित करून शुभ आचरणाकडे प्रवृत्त करतो, तसे राज्याच्या राजानेही केले पाहिजे. ज्याप्रमाणे लोक परमेश्‍वराकडे पितृभावाने पाहतात, अर्थात त्याला पिता मानतात, तद्वत राजालादेखील प्रजाजनांनी पित्यासमान मानावे. ज्याप्रमाणे परमेश्‍वर सर्व जीवांप्रत पुत्र भावाने पाहतो, तद्वत राजानेदेखील प्रजेला पुत्रवत मानावे. जसा परमेश्‍वर सर्व दोष, क्लेश आणि अन्याय दोषापासून मुक्त आहे, तद्वत राजादेखील दोष, अन्यायादीपासून मुक्त असावा. ॥2॥
Subject
पुनश्‍च, तोच विषय -