Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 30 / Mantra 10

22 Mantra
30/10
Devata- विद्वान् देवता Rishi- नारायण ऋषिः Chhand- भुरिगत्यष्टिः Swara- गान्धारः
Mantra with Swara
उ॒त्सा॒देभ्यः॑ कु॒ब्जं प्र॒मुदे॑ वाम॒नं द्वा॒र्भ्यः स्रा॒म स्वप्ना॑या॒न्धमध॑र्माय बधि॒रं प॒वित्रा॑य भि॒षजं॑ प्र॒ज्ञाना॑य नक्षत्रद॒र्शमा॑शि॒क्षायै॑ प्र॒श्निन॑मुपशि॒क्षाया॑ऽअभिप्र॒श्निनं॑ म॒र्यादा॑यै प्रश्नविवा॒कम्॥१०॥

उ॒त्सा॒देभ्य॒ इत्यु॑त्ऽसा॒देभ्यः॑। कु॒ब्जम्। प्र॒मुद॒ इति॑ प्र॒ऽमुदे॑। वा॒म॒नम्। द्वा॒र्भ्य इति॑ द्वाः॒ऽभ्यः। स्रा॒मम्। स्वप्ना॑य। अ॒न्धम्। अध॑र्माय। ब॒धि॒रम्। प॒वित्रा॑य। भि॒षज॑म्। प्र॒ज्ञाना॒येति॑ प्र॒ऽज्ञाना॑य। न॒क्ष॒त्र॒द॒र्शमिति॑ नक्षत्रऽद॒र्शम्। आ॒शि॒क्षाया॒ इत्या॑ऽशि॒क्षायै॑। प्र॒श्निन॑म्। उ॒प॒शि॒क्षाया॒ इत्यु॑पऽशि॒क्षायै॑। अ॒भि॒प्र॒श्निन॒मित्य॑भिऽप्रश्निन॑म्। म॒र्यादा॑यै। प्र॒श्न॒वि॒वा॒कमिति॑ प्रश्नऽविवा॒कम् ॥१० ॥

Mantra without Swara
उत्सादेभ्यः कुब्जम्प्रमुदे वामनन्द्वार्भ्यः स्रामँ स्वप्नायान्धमर्धमाय बधिरम्पवित्राय भिषजञ्प्रज्ञानाय नक्षत्रदर्शमाशिक्षायै प्रश्निनमुपशिक्षायाऽअभिप्रश्निनम्मर्यादायै प्रश्नविवाकम् ॥

उत्सादेभ्य इत्युत्ऽसादेभ्यः। कुब्जम्। प्रमुद इति प्रऽमुदे। वामनम्। द्वार्भ्य इति द्वाःऽभ्यः। स्रामम्। स्वप्नाय। अन्धम्। अधर्माय। बधिरम्। पवित्राय। भिषजम्। प्रज्ञानायेति प्रऽज्ञानाय। नक्षत्रदर्शमिति नक्षत्रऽदर्शम्। आशिक्षाया इत्याऽशिक्षायै। प्रश्निनम्। उपशिक्षाया इत्युपऽशिक्षायै। अभिप्रश्निनमित्यभिऽप्रश्निनम्। मर्यादायै। प्रश्नविवाकमिति प्रश्नऽविवाकम्॥१०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे परमेश्‍वर वा हे राजन्, आपण (उत्सादेभ्यः) विनाश करण्यासाठी उद्युक्त (कुब्जम्) कुबड्या माणसाला आणि (प्रमुदे) प्रबळ अशा काम आदी आनंद उपभोगण्यासाठी (वामनम्) बुटक्या माणसाला (पृथक करा, त्या कार्यापासून परावृत्त करा-कारण कुब्बड असलेला वा अपंग माणूस नाश कसा करणार आणि बुटक्या माणसाला प्रबळ कामाचा उपभोग कसा घेता येईल? म्हणून यांना या कार्यापासून दूर ठेवा) (द्वार्भ्यः) (सुवर्ण लोकांकडून आधार वा आश्रय अपेक्षिणार्‍या) मनुष्यापासून (स्रामम्) ज्याच्या नेत्रातून सतत जलधार व चिपडे निघत असेल, अशा माणसाला दूर ठेवा (तशा केविलवाण्या दीन-दरिद्रीवर कोण दया करणार?) (स्वप्नाय) झोपण्यासाठी (अन्धम्) आंधळ्याला आणि (अधमयि) अधर्माचरणापासून दूर असलेल्यापासून (बधिरम्) बहिर्‍या माणसाला (पृथक करा) (पवित्राय) रोगनिवारणाकरिता (भेषजम्) वैद्य आणि (प्रज्ञानाय) उत्तम ज्ञानवृद्धीसाठी (नक्षत्रदर्शम्) नक्षत्र दाखविणारे अथवा नक्षत्र-विषयापासून गणिताप्रमाणे ज्ञान देणारे गणित-ज्योतिषी (आमच्या राज्यात उत्पन्न करावा (आशित्रायै) उत्तमप्रकारे विद्याग्रहण करण्यासाठी (प्रश्‍निनम्) चांगल्या जिज्ञासू प्रश्‍नकर्ता आणि (उपशिक्षायै) उपवेद आदी विद्या ग्रहण करण्यासाठी (अभि, प्रश्‍निनम्) सर्वत, अनेक प्रश्‍न विचारणारे विद्यार्थी (उत्पन्न करा वा निर्माण करा) आणि मर्यादायै) न्याय व्यवस्थेकडे लक्ष देणारे (प्रश्‍नविवाम्) प्रश्‍नांची विवेचनापूर्ण उत्तरें देणारे ( जनतेच्या योग्य त्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विधिज्ञ माणसें हे परमेश्‍वर, आपण उत्पन्न करा अथवा हे राजन्, आपण निर्माण करा. ॥10॥
Essence
भावार्थ - हे राजन्, जसा पाप करणार्‍यांना परमेश्‍वर लुळे, पांगळे, बुटके, चिपडे, आंधळे वा बहिरे करतो, तसे तुम्ही माणसे ज्या ज्या अवयवांने दुराचरण करतात, त्या त्या अंगाला दंडित करा. तसेच वैद्य, ज्योतिषी अध्यापक, परीक्षक आणि प्रश्‍नांची उत्तरे देणार्‍यांना परमेश्‍वर त्यांच्या श्रेष्ठ कर्मांचे फळें देतो, त्याना बुद्धी, ग्रहणसामर्थ्य, अध्ययन, परीक्षण आणि प्रश्‍नोतर करण्याचे सामर्थ्य देतो, त्याप्रमाणे हे राजन्, आपणही त्या वैद्य आदींचा सन्मान करून राजधर्माची निरंतर उन्नती करा. ॥10॥
Subject
पुन्हा, त्याच विषयी -