Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 8

63 Mantra
3/8
Devata- अग्निर्देवता Rishi- सर्पराज्ञी कद्रूर्ऋषिः Chhand- गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
त्रि॒ꣳश॒द्धाम॒ विरा॑जति॒ वाक् प॑त॒ङ्गाय॑ धीयते। प्रति॒ वस्तो॒रह॒ द्युभिः॑॥८॥

त्रि॒ꣳशत्। धाम॑। वि। रा॒ज॒ति॒। वाक्। प॒त॒ङ्गाय॑। धी॒य॒ते॒। प्रति॑। वस्तोः॑। अह॑। द्युभि॒रिति॒ द्युऽभिः॑ ॥८॥

Mantra without Swara
त्रिँशद्धाम विराजति वाक्पतङ्गाय धीयते । प्रति वस्तोरह द्युभिः ॥

त्रिꣳशत्। धाम। वि। राजति। वाक्। पतङ्गाय। धीयते। प्रति। वस्तोः। अह। द्युभिरिति द्युऽभिः॥८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जो अग्नी (द्युभि:) आपल्या प्रकाशादी गुणांनी (प्रतिवस्तो:) प्रतिदिन (त्रिंशत्) अंतरिक्ष आदित्य आणि अग्नी यांना सोडून पृथ्वी आदी जे तीस (धाम) स्थान (वसु, आदित्य आदित्य या तेहतीस पदार्थमधून अंतरिक्ष, आदित्य व अग्नी यांना वगळल्यास तीस स्थान) आहेत. त्यांना जो अग्नी प्रकाशित करतो, त्या (वहंगाय) गमन, चालत आदी गुणांनी युक्त त्या अग्नीचा महिमा विद्वानांनी (प्रतिवस्तो:) प्रतिदिनी (अह) उत्तम (वाक्) वर्णाद्वारे (धीयते) अवश्य वर्णन करावा. ॥8॥
Essence
भावार्थ - जो प्राणमय शरिरात राहणार्‍या ज्या विद्युतरूप अग्नीमुळे वाणी प्रकट होत असते (ज्या शक्तीद्वारे मनुष्य बोलतो), विद्वानांनी त्या महान् अग्नीच्या गुणांविषयी (आणि लाभांविषयी) दिव्य उपदेश करावा आणि त्याचे गुण ऐकावेत. ॥8॥
Subject
तो अग्नी कसा आहे, हा विषय पुढच्या मंत्रात विशद केला आहे -