Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 7

63 Mantra
3/7
Devata- अग्निर्देवता Rishi- सर्पराज्ञी कद्रूर्ऋषिः Chhand- विराट् गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
अ॒न्तश्च॑रति रोच॒नास्य प्रा॒णाद॑पान॒ती। व्य॑ख्यन् महि॒षो दिव॑म्॥७॥

अ॒न्तरित्य॒न्तः। च॒र॒ति॒। रो॒च॒ना। अ॒स्य॒। प्रा॒णात्। अ॒पा॒न॒तीत्य॑पऽअ॒न॒ती। वि। अ॒ख्य॒न्। म॒हि॒षः। दिव॑म् ॥७॥

Mantra without Swara
अन्तश्चरति रोचनास्य प्राणादपानती व्यख्यन्महिषो दिवम् ॥

अन्तरित्यन्तः। चरति। रोचना। अस्य। प्राणात्। अपानतीत्यपऽअनती। वि। अख्यन्। महिषः। दिवम्॥७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (अस्य) या अग्नीची जी कांती (प्राणात्) ब्रह्मांडात आणि शरीरात ऊर्ध्व गमनशील वायूच्या साह्याने (अपानगती) अधोगमनशील वायूला उत्पन्न करते, ती (रोचना) दीप्ती म्हणजे प्रकाशरूपाने दिसणारी विद्युत (अन्त:) ब्रह्मांडात आणि शरिरात (चरति) संचार करते. अशा प्रकारे (मीहष:) आपल्या गुणांद्वारे तो महान् अग्नी (दिवम्) सूर्यलोकास (व्यख्यत) प्रकाशित करतो (विद्युत हे अग्नीचेच एक व्यापी रूप आहे. अग्नीच व्यापक रूपाने शरिरात व ब्रह्मांडात व्याप्त आहे व तोच आपल्या विद्युत रूपाद्वारे सर्वव्यवहार संपन्न करतो) ॥7॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी हे तत्त्व नीट समजून घ्यावे की विद्युत नावाने प्रसिद्ध सर्व माणसांच्या अंत: करणात राहणारी अग्नीची जी कांती आहे, ती प्राण आणि अपानवायू संयुक्त होऊन प्राण, अपान, अग्नी आणि प्रकाश आदी द्वारे होणारे व्यवहारांना व कार्यांना प्रकटित करीत असते. ॥7॥
Subject
तो अग्नी कसा आहे, हा विषय पुढील मंत्रात सांगितला आहे -