Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 63

63 Mantra
3/63
Devata- रुद्रो देवता Rishi- नारायण ऋषिः Chhand- भूरिक् जगती, Swara- निषादः
Mantra with Swara
शि॒वो नामा॑सि॒ स्वधि॑तिस्ते पि॒ता नम॑स्तेऽअस्तु॒ मा मा॑ हिꣳसीः। निव॑र्त्तया॒म्यायु॑षे॒ऽन्नाद्या॑य प्र॒जन॑नाय रा॒यस्पोषा॑य सुप्रजा॒स्त्वाय॑ सु॒वीर्या॑य॥६३॥

शि॒वः। नाम॑। अ॒सि॒। स्वधि॑ति॒रिति॒ स्वऽधि॑तिः। ते॒। पि॒ता। नमः॑। ते॒। अ॒स्तु॒। मा। मा॒। हि॒ꣳसीः॒। नि। व॒र्त्त॒या॒मि॒। आ॑युषे। अ॒न्नाद्या॒येत्य॑न्न॒ऽअ॒द्याय॑। प्र॒जन॑ना॒येति प्र॒ऽजन॑नाय। रा॒यः। पोषा॑य। सु॒प्र॒जा॒स्त्वायेति॑ सुप्रजाः॒ऽत्वाय॑। सु॒वीर्य्या॒येति॑ सु॒ऽवीर्य्या॑य ॥६३॥

Mantra without Swara
शिवो नामासि स्वधितिस्ते पिता नमस्ते अस्तु मा मा हिँसीः । निवर्त्तयाम्युषे न्नाद्याय प्रजननाय रायस्पोषाय सुप्रजास्त्वाय सुवीर्याय ॥

शिवः। नाम। असि। स्वधितिरिति स्वऽधितिः। ते। पिता। नमः। ते। अस्तु। मा। मा। हिꣳसीः। नि। वर्त्तयामि। आयुषे। अन्नाद्यायेत्यन्नऽअद्याय। प्रजननायेति प्रऽजननाय। रायः। पोषाय। सुप्रजास्त्वायेति सुप्रजाःऽत्वाय। सुवीर्य्यायेति सुऽवीर्य्याय॥६३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे जगदीश्‍वर अथवा हे उपदेशक विद्वान् (सर्वांना हितोपदेश करणारे हे सर्वज्ञानी परमेश्‍वर) आपण (स्वधितिः) अविनाशित्व गुणांमुळे वज्रमय (वृढतम) (असि) आहात. (ते) आपले (शिवः) सुखस्वरूप विज्ञान प्रदाता (नाम) नांव (असि) आहे (आपले नांव सुख आणि ज्ञान देणारे आहे)(ते) आपणांस माझा (नमः) आदरपूर्ण नमस्कार असो. आपण (मा) मला (मा) नका (हि ्ँ सीः) मारू, म्हणजे मला अल्पायू करू नका. (अपमृत्युच्या आहारी जाऊ देऊ नका) याकरिता मी (आयुषे) पूर्ण आयुष्याचा उपभोग घेण्यासाठी (अन्नाद्याय) अन्नादीच्या सेवनासाठी, (सुप्रजास्त्वा) उत्तम पुत्रादी संतती वा चक्रवर्ती राज्याच्या प्राप्तीसाठी (सुवीय्याम) शारीरिक, आत्मिक शक्तीच्या प्राप्तीसाठी व बल-पराक्रम करण्यासाठी तसेच (रायस्पोषाय) विद्या व सुवर्ण आदी धनाच्या वृद्धीसाठी (वर्तमामि) योग्य प्रकारे आचरण करतो व प्रार्थना करतो की आपण मला याच रीतीने आचरण करण्यासाठी प्रवृत्त करा. याप्रकारे वागणूक ठेऊन मी सर्व दुःखापासून मुक्ती मिळवीन व आत्म्यात आपणांस उपास्यदेव म्हणून ठरवून आपल्या अंतर्यामित्वाच्या आश्रयाखाली राहून सर्वांशी सदा-सर्वदा, योग्य प्रकारे वागेन/वागत आहे. ॥63॥
Essence
भावार्थ - मंगलमय, सर्वपालक परमेश्‍वराच्या आज्ञेचे पालन केल्याशिवाय कोणीही माणूस या संसारात सुखी शकत नाही व परलोकी ही सुख प्राप्त करण्यात समर्थ होत नाही. कोणीही नास्तिक पक्ष स्वीकारून ईश्‍वराचा अनादर (उपेक्षा वा निषेध) करूं नये. जो नास्तिक होऊन ईश्‍वराचा अनादर करतो, त्याचा सर्वत्र अनादर होतो. म्हणून सर्व मनुष्यांनी ईश्‍वराविषयी अस्तिकतेची बुद्धी ठेऊन त्याची उपासना अवश्य करावी. ॥62॥
Subject
पुढील मंत्रात रूद्र शब्दाने उपदेशकाच्या गुणांविषयी कथन केले आहे -
Footnote
या तिसर्‍या अध्यायात खालील विषयांचे प्रतिपादन केले आहे - अग्निहोत्र आदी यज्ञांचे वर्णन, अग्नीचा स्वभाव आणि अग्नी शब्दाचा अर्थ, पृथ्वीचे भ्रमण, अग्नी शब्दाने ईश्‍वर व भौतिक अग्नी या अर्थाचे प्रतिपादन, अग्निहोत्राच्या मंत्रांची व्याख्या, ईश्‍वराचे उपस्थान, अग्नी विषयी स्वरूप-कथन, ईश्‍वराची प्रार्थना उपासना आणि या दोन्हीचेलाभ, ईश्‍वराचा स्वभाव, सूर्यकिरणांचे कार्य, निरंतर उपासना, गायत्री मंत्राच्या अर्थाचे प्रतिपादन, यज्ञाचे फळ, भौतिक अग्नीचा अर्थ, गृहस्थाश्रमाच्या आवश्यक कर्त्तव्यांचे अनुष्ठान व लक्षणें, इंद्र आणि पवनाचे कार्य, पुरूर्षार्थाचे अनिवार्यत्व, पापनिवृत्ती, यज्ञाची समाप्ती, सत्याने देणें-घेणे आदी व्यवहार करणे, विद्वांनांच्या स्वभावाचे व ऋतूंच्या वैशिष्ट्यांचे वर्णन, चार प्रकारच्या अंतःकरणांचे लक्षण, रूद्र शब्दाचा अर्थ, तीनशे वर्षाचे आयुष्य प्राप्त करणे आणि धर्मानुसार जीवन व आवश्यक पदार्थांचे ग्रहण, या तिसर्‍या अध्यायाची दुसर्‍या अध्यायाशी संमती जाणावी. (त्यात प्रतिपादित विषयांशी या अध्यायातील विषयांचा संबंध अवश्य जोडून पाहावा.)^॥ यजुर्वेदाचा तिसरा अध्याय समाप्त ॥