Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 62

63 Mantra
3/62
Devata- रुद्रो देवता Rishi- नारायण ऋषिः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
त्र्या॒यु॒षं ज॒म॑दग्नेः क॒श्यप॑स्य त्र्यायु॒षम्। यद्दे॒वेषु॑ त्र्यायु॒षं तन्नो॑ऽअस्तु त्र्यायु॒षम्॥६२॥

त्र्या॒यु॒षमिति॑ त्रिऽआयु॒षम्। ज॒मद॑ग्नेरिति॑ ज॒मत्ऽअ॑ग्नेः। क॒श्यप॑स्य। त्र्या॒यु॒षमिति॑ त्रिऽआयु॒षम्। यत्। दे॒वेषु॑। त्र्या॒यु॒षमिति॑ त्रिऽआयु॒षम्। तत्। नः॒। अ॒स्तु॒। त्र्या॒यु॒षमिति॑ त्रिऽआयु॒षम् ॥६२॥

Mantra without Swara
त्र्यायुषञ्जमदग्नेः कश्यपस्य त्र्यायुषम् । यद्देवेषु त्र्यायुषन्तन्नो अस्तु त्र्यायुषम् ॥

त्र्यायुषमिति त्रिऽआयुषम्। जमदग्नेरिति जमत्ऽअग्नेः। कश्यपस्य। त्र्यायुषमिति त्रिऽआयुषम्। यत्। देवेषु। त्र्यायुषमिति त्रिऽआयुषम्। तत्। नः। अस्तु। त्र्यायुषमिति त्रिऽआयुषम्॥६२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
पदार्थ - हे जगदीश्‍वर, (यत्) जे (देवेषु) विद्वज्जन (त्र्यायुषम्) ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि सन्यास आश्रमांत परोपकार करीत जसे जीवन जगत आहेत, तसेच (जमदग्नेः) चक्षु आदी इंद्रियांमधे (त्र्यायूषम्) शुद्धी, बळ आणि पराक्रम हे तीन गुण धारण करीत विद्वज्जनामधे (कश्यपस्य) ईश्‍वराने निश्‍चित केलेली (त्र्यायुषम्) तिप्पट आयुर्मयादा म्हणजे तीनशे वर्षापेक्षा अधिक आयुष्य दिसत आहे (चार आश्रमात परोपकार करीत, शुद्धता आणि पराक्रम करीत विद्वज्जन तीनशे वर्ष जगतात) अशा विद्वज्जन तिप्पट आयूष्यापेक्षा अधिक जीवन प्राप्त करतात आणि (तत्) त्या जीवनात शरीर आत्मा आणि समाज यांना सुख देतात (त्र्यायुषम्) तसेच तेवढे जीवन जगण्यासाठी तीनशे वर्षाहून अधिक आयुष्य (नः) आम्हांला द्या. (चार आश्रमांचे कर्त्तव्य पालन करीत, परोपकार करीत सर्वांना सुखी करण्यासाठी आम्हांला तीनशे वर्षाहून अधिक जीवन लाभावे, ही इच्छा) ॥62॥
Essence
भावार्थ - या मंत्रात सर्व मनुष्यांसाठी असे सांगितले आहे की चक्षु हे सर्व इंद्रिय इंद्रियांमधे उत्तम असून परमेश्‍वर सर्व रचनाकारांहून श्रेष्ठ असा रचयिता आहे. या मंत्रात ‘त्र्यायुषम्’ या पदाची चारवेळा आवृत्ती आहे. म्हणजे तीनशे वर्षापेक्षा अधिक अर्थात चारशे वर्षापर्यंत आयुष्य असावे, असे सांगितले आहे. या करिता परमेश्‍वराची प्रार्थना आणि पुरूषार्थ-प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रार्थना याप्रमाणे करावी-‘हे परमेश्‍वरा, तुझ्या कृपेमुळे जसे विद्वज्जन विद्या, धर्म आणि परोपकार यांचे पालन करीत तीनशे वर्षापर्यंत आनंदमय जीवन जगतात, तसेच आम्ही देखील शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकाररूप अंतःकरण, इंद्रियें आणि प्राण आदींना तीन प्रकारच्या तापापासून मुक्त ठेवावे आणि सुखकारक विद्याविज्ञानासह आयुष्य प्राप्त करून तीनशे वर्ष किंवा चारशेवर्षापर्यंत सुखी आयुष्य भोगावे. ॥62॥
Subject
माणसाला किती कशा प्रकारचे आयुष्य पाहिजे, याविषयी परमेश्‍वराजवळ प्रार्थना करावी, पुढील मंत्रात हा विषय प्रतिपादित आहे -