Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 61

63 Mantra
3/61
Devata- रुद्रो देवता Rishi- वसिष्ठ ऋषिः Chhand- पङ्क्ति, Swara- पञ्चमः
Mantra with Swara
ए॒तत्ते॑ रुद्राव॒सं तेन॑ प॒रो मूज॑व॒तोऽती॑हि। अव॑ततधन्वा॒ पिना॑कावसः॒ कृत्ति॑वासा॒ऽअहि॑ꣳसन्नः शि॒वोऽती॑हि॥६१॥

ए॒तत्। ते॒। रु॒द्र॒। अ॒व॒सम्। तेन॑। प॒रः। मूज॑वत॒ इति॒ मूज॑ऽवतः। अति॑। इ॒हि॒। अव॑ततध॒न्वेत्यव॑ततऽधन्वा। पिना॑कावस॒ इति॒ पिना॑कऽअवसः। कृत्ति॑वासा॒ इति॒ कृत्ति॑ऽवासाः। अहि॑ꣳसन्। नः॒। शि॒वः। अति॑। इ॒हि॒ ॥६१॥

Mantra without Swara
एतत्ते रुद्रावसन्तेन परो मूजवतो तीहि । अवततधन्वा पिनाकावसः कत्तिवासा अहिँसन्नः शिवो तीहि ॥

एतत्। ते। रुद्र। अवसम्। तेन। परः। मूजवत इति मूजऽवतः। अति। इहि। अवततधन्वेत्यवततऽधन्वा। पिनाकावस इति पिनाकऽअवसः। कृत्तिवासा इति कृत्तिऽवासाः। अहिꣳसन्। नः। शिवः। अति। इहि॥६१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
पदार्थ - (रूद्र) शत्रूंना रडविणार्‍या आणि युद्ध विद्येत निपुण अशा हे विद्यावान सेनाध्यक्ष आपण (अवततधन्वा) युद्धात विशाल धनुष्याला धारण करणारे आहात. (पिनाकावसः) पिनाक शस्त्रानें शत्रुसैन्याचा विध्वंस करून आपण स्वरक्षा करण्यास समर्थ आहात. (कृत्तिवासार) चमड्यापासून निर्मित व अन्य कवचासमान अभेद्य दृढ वस्त्रांना धारण करून (शिवः) सर्वांना सुख देण्याकरिता (परः) उत्तम सामर्थ्यशील, शूर सैनिका) सह (मूजवतः) ज्यावर भरपूर मुंज नांवाचे गवत आहे, असा भूजवान् पर्वत ओलांडून परकीय देशामधे जा आणि (अतीहि) शत्रुदेशाला पराभूत करा. (एतत्) ही जी (ते) तुमची (अबसम्) सुरक्षा शक्ती आहे. (तेन) त्याद्वारे (नः) आम्हां देशीय जनांचे (अहिंसम्) रक्षण करीत व आम्हांस सकुशल ठेवीत तुम्ही (अतीहि) आमचा सर्वदृष्ट्या रक्षण व वर्णन करा.॥61॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, तुम्ही आपल्या शत्रूंना नष्ट करून स्वराज्यास निष्कंटक करा. सर्व प्रकारच्या विध्वंसक अस्त्रशस्त्रांचे उत्पादन व संग्रह करून दुष्टांचा नाश आणि श्रेष्ठजनांची रक्षा करा. यासाठी की असे केल्यानेच दुष्ट शत्रू सुखी होणार नाहीत व सज्जन कधीही दुःखी होणार नाहीत. ॥61॥
Subject
पुढील मंत्रात रूद्र शब्दाने, शूरवीराच्या कर्तव्यांविषयी कथन केले आहे -