Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 6

63 Mantra
3/6
Devata- अग्निर्देवता Rishi- सर्प्पराज्ञी कद्रूर्ऋषिः Chhand- निचृत् गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
आयं गौः पृश्नि॑रक्रमी॒दस॑दन् मा॒तरं॑ पु॒रः। पि॒तरं॑ च प्र॒यन्त्स्वः॑॥६॥

आ। अ॒यम्। गौः। पृश्निः॑। अ॒क्र॒मी॒त्। अस॑दत्। मा॒तर॑म्। पु॒रः। पि॒तर॑म्। च॒। प्र॒यन्निति॑ प्र॒ऽयन्। स्व॒रिति॒ स्वः᳕ ॥६॥

Mantra without Swara
आयङ्गौः पृश्निरक्रमीदसदन्मातरम्पुरः पितरञ्च प्रयन्त्स्वः ॥

आ। अयम्। गौः। पृश्निः। अक्रमीत्। असदत्। मातरम्। पुरः। पितरम्। च। प्रयन्निति प्रऽयन्। स्वरिति स्वः॥६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (अयम्) ही प्रत्यक्ष दिसणारी (गौ:) गोल रूप पृथ्वी (पितरम्) त्याचे पालन करणार्‍या (स्व:) सूर्याच्या/सूर्यलोकाच्या (पुर:) पुढे पुढे (मातरम्) आपल्या उत्पत्तीचे कारण जे जल, त्या जलासहित (प्रयन्) उत्तम प्रकारे परिभ्रमण करीत (पृश्‍नि:) अन्तरिक्षात वा आकाशात (आक्रमीत्) सूर्याच्या भोवती फिरत आहे. ॥6॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी हे जाणून घ्यावे की गोल भू अर्थात् पृथ्वीची जल आणि अग्नीच्या निमित्ताने (म्हणजे जीवांना जल आणि अग्नी देण्यासाठी) उत्पत्ती झाली आहे. ती अंतरिक्षामधे आपल्या कक्षेत प्रतिक्षण फिरत आहे. तिच्या उत्पत्तीचे कारण जे जल, त्या जलासहित आकर्षण शक्तीद्वारे ती सर्वांचे रक्षण करणार्‍या सूर्याभोवती फिरत आहे. या तिच्या गतीमुळेच दिवस-रात्र, शुक्ल वा कृष्ण पक्ष, ऋतू आणि अयन आदी कालविभाग होत असतात. ॥6॥
Subject
अग्नीचे कारणे/अग्नीमुळे पृथ्वीचे भ्रमण होत आहे, हा विषय पुढील मंत्रात प्रतिपादित केला आहे -