Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 58

63 Mantra
3/58
Devata- रुद्रो देवता Rishi- बन्धुर्ऋषिः Chhand- विराट् पङ्क्ति, Swara- पञ्चमः
Mantra with Swara
अव॑ रु॒द्रम॑दीम॒ह्यव॑ दे॒वं त्र्य॑म्बकम्। यथा॑ नो॒ वस्य॑स॒स्कर॒द् यथा॑ नः॒ श्रेय॑स॒स्कर॒द् यथा॑ नो व्यवसा॒यया॑त्॥५८॥

अव॑। रु॒द्रम्। अ॒दी॒म॒हि॒। अव॑। दे॒वम्। त्र्य॑म्बक॒मिति॒ त्रिऽअ॑म्बकम्। यथा॑। नः॒। वस्य॑सः। कर॑त्। यथा॑। नः॒। श्रेय॑सः। कर॑त्। यथा॑। नः॒। व्य॒व॒सा॒यया॒दिति॑ विऽअवसा॒यया॑त् ॥५८॥

Mantra without Swara
अव रुद्रमदीमह्यव देवन्त्र्यम्बकम् । यथा नो वस्यसस्करद्यद्यथा नः श्रेयसस्करद्यद्यथा नो व्यवसाययात् ॥

अव। रुद्रम्। अदीमहि। अव। देवम्। त्र्यम्बकमिति त्रिऽअम्बकम्। यथा। नः। वस्यसः। करत्। यथा। नः। श्रेयसः। करत्। यथा। नः। व्यवसाययादिति विऽअवसाययात्॥५८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ -(त्र्यम्बकम्) तीन्ही काळात जो एकरस आणि ज्ञानयुक्त आहे, अशा (देवम्) आम्हांस ज्ञान देणार्‍या (रूद्रम) दुष्टांना रडविणार्‍या जगदीश्‍वराची उपासना करून आम्ही सर्व दु:खांचे (अवादीमहि) पूर्णपणे निवारण करू. (यथा) ज्याप्रमाणे परमेश्‍वर (नः) आम्हांस (वस्यसः) शांत व स्थिर निवास करणारे (अवाकरत्) करतो (शांत जीवन व्यतीत करण्याची कृपा करतो) (यथा) ज्याप्रमाणे (नः) आम्हाला (श्रेयसः) अत्यंत श्रेष्ठ (करत्) करतो, (यथा) निश्‍चयी करतो त्याप्रमाणे जनहो या, आम्हांस सुखेन ठेवणार्‍या, उत्तम गुण देणार्‍या आणि सत्याचरणाचा उपदेश देणार्‍या त्या परमेश्‍वराची, केवळ त्याचीच आम्ही प्रार्थना करू या. (ईश्‍वरच शांत तन, मन जीवन देणारा, श्रेष्ठत्व व निश्‍चयवृत्ती देणारा आहे. आमही केवळ त्याचीच उपासना, प्रार्थना कर या.) ॥58॥
Essence
भावार्थ - कोणीही माणूस ईश्‍वराची उपासना व प्रार्थना केल्याशिवाय आपल्या सर्व दु:खांचा नाश करू शकत नाही. कारण असे की परमेश्‍वरच सर्वांना सुखमय निवास स्थान व जीवन देणारा आहे, आणि तोच उत्तमोत्तम सत्य निश्‍चय व संकल्प करण्याची प्रेरणा देतो. यामुळे त्याची जशी जी आज्ञा आहे, सर्व मनुष्यांनी त्याचे पालन करणे उचित आहे. ॥58॥
Subject
पुढील मंत्रात रूद्र शब्दाने ईश्‍वराविषयी उपदेश केला आहे-