Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 57

63 Mantra
3/57
Devata- रुद्रो देवता Rishi- बन्धुर्ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
ए॒ष ते॑ रुद्र भा॒गः स॒ह स्वस्राम्बि॑कया॒ तं जु॑षस्व॒ स्वाहै॒ष ते॑ रुद्र भा॒गऽआ॒खुस्ते॑ प॒शुः॥५७॥

ए॒षः। ते॒। रु॒द्र॒। भा॒गः। स॒ह। स्वस्रा॑। अम्बि॑कया। तम्। जु॒ष॒स्व॒। स्वाहा॑। ए॒षः। ते॒। रु॒द्र॒। भा॒गः। आ॒खुः। ते॒। प॒शुः ॥५७॥

Mantra without Swara
एष ते रुद्र भागः सह स्वस्राम्बिकया तञ्जुषस्व स्वाहैष ते रुद्र भाग आखुस्ते पशुः ॥

एषः। ते। रुद्र। भागः। सह। स्वस्रा। अम्बिकया। तम्। जुषस्व। स्वाहा। एषः। ते। रुद्र। भागः। आखुः। ते। पशुः॥५७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (रूद्र) अन्यायी मनुष्यांना रडविणार्‍या विद्वान महाशय. (ते) तुमच्या करिता प्रस्तुत (एषः) हा जो (भाः) सेवनास योग्य असा पदार्थसमूह आहे (जे आम्ही अन्यायापासून आमचे रक्षण करण्याबद्दल तुम्हाला भेट देत आहोत) याचे तुम्ही (अम्बिकथा) वेदवाणीचे (पठण-अध्ययन करीत) (स्वस्रा) उत्तम विद्या व कृती (सह) सह (जुषस्व) सेवन करा. (रक्षण विद्याध्ययन करीत आम्ही प्रसुत केलेल्या पदार्थाने पुष्ट व्हा) तसेच हे (रूद्र) विहान, (ते) तुमचा) (एषः) हा जो (भागः) धर्माने व अधिकाराने प्रप्तव्य अंश आहे, त्याचे व (स्वाहा) वेदवाणीने सेवन करा. (रूद्र) हे विद्वान, (ते) तुमचे (एषः) हे जे (आखुः) खोदण्याचे साधन आहे व जो (पशुः) भोग्य पदार्थ आहे, (तम्) त्याचा (जुषस्व) योग्य वापर करा ॥1॥ ^दुसरा अर्थ - (प्राणपरक अर्थ) जो (एषः) हा (रूद्र) प्राण आहे, (ते) त्याचा (एषः) हा जे देय भाग किंवा वाटा आहे, त्या भागाचे त्याने (अम्बिकया) वाणीसोबत किंवा (स्वस्रा) विद्या व कृती (सह) सह (जुषस्व) सेवन करावे (प्राण शक्तीचा वाणी व विद्याप्राप्ती आणि व्यवहारासाठी उपयोग करावा) तसेच (ते) त्या प्राणाचा (स्वाहा) सत्यभाषणरूप जो (भागः) आहे, तसेच जे (आखुः) खोदण्यामुळे प्राप्त होणारे पदार्थ आहेत व जे (पशुः) जमिनीच्या वर उगवणारे व दिसणारे भोग्य पदार्थ आहेत, त्यांचा हा प्राण (जुषस्व) सेवन करीत असतो, त्यांचेच सेवन सर्व माणसांनी केले पाहीजे. (प्राणरक्षणासाठी भूमिगत किंवा भूउत्पन्न भोग्य अन्नादींचा उपभोग घेतला पाहिजे. तसेच सत्यभाषण प्राणशक्ती वाढविणारा गुण आहे) ॥2॥ ॥57॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे. ज्याप्रमाणे पूर्ण विद्यायुक्त एक भाऊ आपल्या बहिणीसह वेदवाणी व शब्दविद्या शिकून आनंदित होतो, त्याप्रमाणे विद्वान देखील विद्या प्राप्त करून सुखी होत असतो, ज्याप्रमाणे हा प्राण श्रेष्ठ शब्दविद्येमुळे प्रिय आणि आनंददायी वाटतो, त्याप्रमाणे सुशिक्षित विद्वान देखील सर्वांना सुखी करतो. वेदविद्या व शब्दविद्या या दोन्हीचे ज्ञान प्राप्त केल्याशिवाय (किंवा विद्वान् व प्राणशक्ती या दोन्ही शिवाय) कोणीही माणूस सत्यज्ञान मिळविण्यात अगर सुखोपभोग घेण्यात समर्थ होऊ शकत नाही. ॥57॥
Subject
मनाचे लक्षण सांगितल्यानंतर आतां प्राणांच्या लक्षणाविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -